हावगीस्वामीच्या तीन विद्यार्थ्यांचे आकाशवाणी केंद्रावर राज्यस्तरीय प्रसारण

0
हावगीस्वामीच्या तीन विद्यार्थ्यांचे आकाशवाणी केंद्रावर राज्यस्तरीय प्रसारण

हावगीस्वामीच्या तीन विद्यार्थ्यांचे आकाशवाणी केंद्रावर राज्यस्तरीय प्रसारण

उदगीर (एल.पी.उगीले) : आकाशवाणी परभणी केंद्र निर्मित स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त युवा दिनाचे औचित्य साधून दिनांक १२ जानेवारी २०२५ रोजी सायंकाळी साडेपाच वाजता युववाणी या कार्यक्रमात श्री हावगीस्वामी महाविद्यालय उदगीर येथील तीन विद्यार्थ्यांचे विचार भारत सरकारच्या महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्राच्या माध्यमावर प्रसारित झाले.
आकाशवाणी केंद्रावर प्रसारित कार्यक्रमात स्वामी विवेकानंद आणि त्यांचे युवकाविषयीचे प्रेरणादायी विचार या विषयावर कु.श्वेता बळीराम हुनसनाले बी.कॉम.तृतीय वर्ष, कु.शुभांगी विजयकुमार बिरादार बी.ए.द्वितीय वर्ष व अक्षय दत्तात्रय दुवे बी.ए.प्रथम वर्ष या विद्यार्थ्यांनी आपले विचार व्यक्त केले.
याबद्दल महाविद्यालयात भारत लिबरल एज्युकेशन सोसायटीचे सचिव उमेश पाटील देवणीकर, उपाध्यक्ष शिवकुमार हसरगुंडे, कोषाध्यक्ष शंकरप्पा हरकरे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्र.प्राचार्य डॉ.एन.जी.एमेकर , उपप्राचार्य डॉ. ए.ए.काळगापुरे, ग्रंथपाल प्रा.अजित रंगदळ व राम राठोड उपस्थित होते. महाविद्यालयातील या विद्यार्थ्यांना मराठी विभागातील डॉ.म.ई.तंगावार यांचे मार्गदर्शन लाभले.
भारत सरकारच्या माध्यमावर विद्यार्थ्यांचे राज्यस्तरीय प्रसारण झाल्याबद्दल भारत लिबरल एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष
ॲड.गुणवंतराव पाटील हैबतपूरकर, सचिव उमेश पाटील देवणीकर, उपाध्यक्ष शिवकुमार हसरगुंडे, संगमेश्वर जिरगे, सहसचिव प्रभूराज कप्पीकेरे, कोषाध्यक्ष शंकरप्पा हरकरे, संस्थेचे सर्व सन्माननीय सदस्य,प्र.प्राचार्य डॉ.एन.जी.एमेकर , उपप्राचार्य डॉ.ए.ए.काळगापुरे, डॉ.म.ई.तंगावार, कार्यालयीन अधीक्षक ऋषिकेश पाटील, महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी,आकाशवाणीचे श्रोते व विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!