शिक्षकेतर संघटन महामंडळाच्या राज्यस्तरीय अधिवेशनास मोठ्या संख्येने उपस्थित रहा – राजेश्वर चापुले
शिक्षकेतर संघटन महामंडळाच्या राज्यस्तरीय अधिवेशनास मोठ्या संख्येने उपस्थित रहा - राजेश्वर चापुले
उदगीर (एल.पी.उगीले) : शिक्षकेतर संघटन महामंडळाच्या 52 व्या राज्यस्तरीय अधिवेशनासाठी तमाम शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेत्तर महामंडळाच्या विभागीय कार्यवाह या नात्याने राजेश्वर चापुले यांनी केले आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर महामंडळाचे 52 वे राज्यस्तरीय अधिवेशन चिमूर, जिल्हा चंद्रपूर येथे 19 जानेवारी रोज रविवार रोजी होत आहे.या अधिवेशनास विभागातील जास्तीत जास्त शिक्षकेतर कर्मचारी यांनी उपस्थित राहावे. असे आवाहन विभागीय कार्यवाह राजेश्वर चापुले जिल्हाध्यक्ष अमोल चामे यांनी केले आहे. शिक्षकेतर महामंडळाच्या या अधिवेशनास मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे नूतन शिक्षण मंत्री दादाजी भुसे उपस्थित राहणार आहेत. अधिवेशनासाठी राज्यातून जवळपास पाच ते सहा हजार कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. माध्यमिक शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे अनेक प्रलंबित प्रश्न महामंडळाच्या माध्यमातून यापूर्वी सोडवण्यात आलेले असून उर्वरित प्रलंबित प्रश्न देखील सोडवण्यात येतील. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उपस्थित रहावे. असे आव्हान महामंडळाचे विभागीय कार्यवाह राजेश्वर चापुले व लातूर जिल्हाध्यक्ष अमोल चामे व अनिल दरेकर, शंकर गरड पाटील, विनोद मलशेट्टी, आर्य , मुन्ना चंदिले, पांडुरंग देडे, पांडुरंग चिंचोलकर आदींनी केलेले आहे.
