राज्य क्रीडा दिन उत्साहात संपन्न

0
राज्य क्रीडा दिन उत्साहात संपन्न

राज्य क्रीडा दिन उत्साहात संपन्न

अहमदपूर (गोविंद काळे) : 15 जानेवारी कुस्तीगीर खाशाबा जाधव यांच्या जन्मदिनानिमित्त राज्य क्रीडा दिन जयहिंद प्रयाग प्राथमिक विद्या मंदिर व अहिल्यादेवी होळकर माध्यमिक विद्यालय अहमदपूर येथे साजरा करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांना विविध खेळांची माहिती देण्यात आली त्याचबरोबर शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त प्रा. दत्ताभाऊ गलाले यांचा सत्कार संस्थेचे कार्याध्यक्ष श्री शिवराज माने यांनी केला. यावेळी विद्यालयातील राष्ट्रीय, राज्यस्तरीय खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. खाशाबा जाधव हे मराठी कुस्तीगीर होते. त्यांनी स्वातंत्र्योत्तर काळात भारतासाठी ऑलिंपिकमध्ये वैयक्तिक पदक जिंकले होते. त्यांच्याबद्दलची माहिती खालीलप्रमाणे खाशाबा जाधवांचा जन्म जानेवारी १५, १९२५ रोजी सातारा जिल्ह्यातील गोळेश्वर येथे झाला होता. त्यांचे निधन ऑगस्ट १४, १९८४ रोजी झाले. त्यांनी १९५२ मध्ये हेलसिंकी येथे झालेल्या ऑलिंपिकमध्ये फ्रीस्टाइल कुस्तीत कांस्यपदक जिंकले होते. १९४८ मध्ये लंडन येथे झालेल्या ऑलिंपिकमध्ये त्यांनी फ्लायवेट वजनगटातील कुस्तीत सहावा क्रमांक मिळवला होता. खाशाबा जाधवांना केडी जाधव या नावानेही ओळखले जाते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!