समाजातील एकोपा वाढविण्यासाठी संतांचे विचार आत्मसात करावे- प्रा. मनोहर जायेभाये
समाजातील एकोपा वाढविण्यासाठी संतांचे विचार आत्मसात करावे- प्रा. मनोहर जायेभाये
किनगाव (गोविंद काळे) : मध्ययुगीन काळापासून संतांनी जाती निर्मूलन करून बंधुभाव व एकोपा निर्माण करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. त्यांच्या विचारामुळेच जाती-जातीमध्ये बंधुत्वाची भावना टिकून राहिली. सर्व जाती-जमातीमध्ये संत निर्माण झाले त्यांनी आपल्या वाङ्ममयातून एकात्मतेचा संदेश दिला. राष्ट्रसंत भगवान बाबांना गुरु मानणारे वंजारी समाजातील लोकापेक्षा इतर समाजातील लोक मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यांनी कीर्तनाच्या माध्यमातून नामभक्ती बरोबरच व्यसनमुक्ती, बंधूभाव, शिक्षण, अंधश्रद्धा निर्मूलन, टाकाऊ रूढी परंपरा याविषयी विचार मांडले. आज समाजातील बंधुभाव व एकोपा नष्ट होऊन जातीमध्ये वैमनस्य निर्माण होत आहे अशा वेळी संतांचे विचार आत्मसात करून समाजात एकोपा वाढवावा असे विचार प्रा. मनोहर जायेभाये यांनी हिंगणगाव येथे राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या जयंती निमित्ताने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड आणि श्री संत अंबाजी महाराज सार्वजनिक वाचनालय हिंगणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित बहि:शाल व्याख्यानमालेमध्ये बोलताना काढले यावेळी विचार मंचावर संस्थेचे सचिव भरत राख गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार ग्रंथपाल नवनाथ बाबुराव घुले यांनी व्यक्त केले. व्याख्यानास गावातील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणावर हजर होते.
