पर्यावरणामधील उत्कृष्ट व सातत्यपूर्ण कार्याबद्दल प्रा अनिल चवळे यांचा नवी मुंबई येथे सन्मान
पर्यावरणामधील उत्कृष्ट व सातत्यपूर्ण कार्याबद्दल प्रा अनिल चवळे यांचा नवी मुंबई येथे सन्मान
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील गेले अनेक वर्ष पर्यावरण वृक्ष लागवड व वृक्ष चळवळ या क्षेत्रात कार्य करणारे, रोटरी डिस्ट्रिक्ट थ्री वन थ्री टू चे पर्यावरण संचालक अनिल चवळे यांचा या क्षेत्रातील उत्कृष्ट व सातत्यपूर्ण कार्य बद्दल नवी मुंबई नेरूळ येथे तेरणा चॅरिटेबल ट्रस्ट, रायझिंग अँड ग्रीन मराठवाडा, एम एस बिडवे इंजीनियरिंग कॉलेज व इंजीनियर्स असोसिएशन मुंबई यांच्या वतीने मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन त्यांचा कार्याचा गौरव करण्यात आला.
यावेळी मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून केदार चंद्रकांत जॉईंट कमिशनर, बुद्धिराज देशमुख सीईओ टॅको, उद्योगपती शिवशंकर लातूरे, अल्पिनी देशमुख, संतोष सिंग प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन तेरणा इंजिनिअरिंग व मेडिकल कॅम्पस नवी मुंबई येथे प्राचार्य डॉ. विक्रम माने व ग्रीन मराठवाडा चे संतोष सिंग यांच्या प्रयत्नातून संपन्न झाले.
प्रा अनिल चवळे अहमदपूर आणि परिसरात गेली अनेक वर्ष वृक्ष लागवड, संवर्धन व शेतकऱ्यांसोबत बांबू लागवड यासाठी कार्यरत आहेत.
यावर्षी त्यांनी रोटरी चे पर्यावरण डायरेक्टर म्हणून प्रांतपाल डॉक्टर सुरेश साबू यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या उत्कृष्ट कार्याची दखल घेऊन राज्यपातळीवर महाराष्ट्रातील पर्यावरण क्षेत्रातील मान्यवर मंडळी सोबत त्यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी लातूर जिल्ह्यातील डॉ. पवन लड्डा ग्रीन वृक्ष लातूर यांचाही यांच्या उत्कृष्ट व सातत्यपूर्ण कार्याबद्दल सन्मान करण्यात आला.
प्रा अनिल चवळे यांच्या या सन्मानाबद्दल अहमदपूर मधील पर्यावरण व वृक्ष चळवळ च्या क्षेत्रात आनंद व्यक्त करण्यात येत असून.
त्यांचे प्रा.दत्ता गलाले, प्रशांत माने, राजेंद्र कल्याणे, महेंद्र खंडागळे, हरिदास तम्मेवार, राजेसाहेब कदम, अहमद तांबोळी, प्रा शिवशंकर पाटील, कपिल बिरादार, अनिल फुलारी यांच्यासह रोटरी चे सर्व सदस्य व पर्यावरणवादी संघटनांनी अभिनंदन केले आहे.
