शिल्पाताई साठी देवदूत ठरले विजय मन्मथआप्पा तत्तापुरे
शिल्पाताई साठी देवदूत ठरले विजय मन्मथआप्पा तत्तापुरे
जिवाची पर्वा न करता पाण्यात बुडणाऱ्या महिलेचे वाचवले प्राण….
अहमदपूर (गोविंद काळे) : दि १६ जाने रोजी सकाळी श्रीराम फायनान्सचे अहमदपूर शाखा मॅनेजर विजय तत्तापुरे किनगावकडे जात होते वाकि नदिच्या पुलाच्या पुढे गेले असताना त्यांना पाठीमागे नदीत काहितरी पडल्याचा आवाज आला म्हणून परत फिरुन पुलावरून नदीत पाहिले पण काही दिसत नाही म्हणून परत वळणार तोच पाण्यातुन स्कुटी वर आल्याची दिसली आणि त्यापाठोपाठ एक महिला पाण्यात बुडून वर आल्याची दिसली तेव्हा त्यांनी मागचा पुढचा पाण्याच्या खोलीचा अंदाज याचा विचार न करत पायातले बुट व मोबाईल काढून पाण्यात उडी मारली पाण्यात पाय टेकत नव्हते त्यांची उंची सहा फुटापेक्षा जास्त असतानाही पाय टेकत नव्हते तरी काही ही होवो म्हणून त्यांनी बुडणाऱ्या शिल्पाताईचा हात पकडला व कडेला आणले तेव्हा त्या बेशुद्ध झाल्या होत्या काठाला येऊन जोर जोराने हेल्प हेल्प ओरडत होते पण कोणी बघत नव्हते ते घाबरून गेले होते काही सुचत नव्हते तेव्हा त्यांनी वर येऊन संतोष गोरे यांना फोन लावला क्षणाचाही विलंब न करता संतोष गोरे त्याठिकाणी आले त्यांनी बघितले विजय तत्तापुरे कोंबड्याच्या पंखानी, बेंदाडाने लिडबिड दिसत होते. दोघांनी शिल्पाताईना वर रोडवर आणले संतोष गोरे यांनी आणलेल्या बिसलरीचे पाणी तोंडावर मारले आणि दवाखान्यात नेण्यासाठी विनंती करत होते पण अशा परिस्थितीत कुणीही जवळ येत नव्हते गाडी थांबवत नव्हते तितक्यात एक बोलेरोवाला थांबला त्यांनी सदर महिलेला ग्रामीण आरोग्य केंद्रात दाखल केले सदर महिला सुशावर आल्यास कळले कि स्कुटीवर गावाकडे जात असताना चक्कर आली व स्कुटीसह पाण्यात जाऊन पडल्याचे महिलेने सांगितले..
सदर महिलेवर ग्रामीण आरोग्य केंद्राचे डॉ जयप्रकाश केंद्रे यांनी उपचार केले. विजय तत्तापुरे यांचे कुंटुबीयांनी आभार मानले, तसेच शहरातील नागरिक व मित्रपरिवार यांच्या कडून श्री विजय तत्तापुरे याचे कौतुक केले जात आहे. खरच विजयराव तुम ग्रेट हो. अशा माणसाचा सन्मान व्हायला हवा कारण हि प्रेरणा घेऊन इतरही संकटसमयी लोक मदत करतील.
