बियाणे विक्री परवाना नसताना बनावट बियाणे विक्री केल्याने गुन्हा दाखल

0
बियाणे विक्री परवाना नसताना बनावट बियाणे विक्री केल्याने गुन्हा दाखल

बियाणे विक्री परवाना नसताना बनावट बियाणे विक्री केल्याने गुन्हा दाखल

अहमदपूर (गोविंद काळे) : येथे बियाणा परवाना प्राप्त केल्या खेरीज विनापरवाना कांदा विक्री व्यवसाय व विपणन करणे, उगवन शक्तीच्या किमान मापदंडानुसार नसलेली अप्रमाणित निकृष्ट दर्जाचे नकली कांदा बियाण्याचे पुरवठा व विक्री करणे, बियाणे विक्रीची नकली पावती देणे, बियाणे पॉकिट त्यावरील लेबल वर चुकीचा आणि दिशाभूल करणारे मजकूर छापणे तसेच बनावट नावाने बियाणे उत्पादक कंपनी असल्याचे भासवून शेतकऱ्याची व शासनाची फसवणूक केल्यामुळे अहमदपूर पोलीस स्टेशन येथे दिनांक 14- 1- 2025 रोजी बी- बियाणे कायदे अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला
सविस्तर माहिती अशी की श्री आनंदराज गिरी नामक व्यक्तीने अहमदपूर येथील दुकानात पुना फुरसुंगी जातीचे कांदा बियाणे विक्री केले होते सदरील त्या व्यक्तीस दुकानदारांनी कंपनीचा परवानाची मागणी केली असता त्या व्यक्तीने दुकानदारास परवाना व समाधान कारक माहिती न देता निघून गेला दुकानदाराने बियाणी निरीक्षक पंचायत समिती यांना माहिती दिली असता दुकानदाराच्या तक्रारीवरून कायदेशीर कारवाई व सखोल चौकशी केली असता गिरी अर्बन सीड्स प्रा. ली. जळगाव या नावाच्या कोणत्याही कंपनीस राज्याच्या विक्री परवाना नसल्याचे निष्पन्न झाल्याने बियाणे कायदे अंतर्गत श्री आनंदराज गिरीनामक व्यक्तीवर पोलीस स्टेशन अहमदपूर येथे भा द वी कलम 420 बियाणे कायदा कलम 3,8,9,7B 17A , नियम10,11,12,13 आत्या अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955 कलम(3) (2) कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला सदरील कारवाई मा. श्री दीपक सुपेकर – कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद लातूर, श्री प्रवीण भोर – तंत्र अधिकारी विभागीय कृषी सहसंचालक लातूर, श्री मिलिंद बीडबाग – मोहीम अधिकारी जिल्हा परिषद लातूर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री यशपाल सातपुते बियाणे निरीक्षक तथा कृषी अधिकारी पंचायत समिती अहमदपूर यांनी फिर्याद दाखल केली या कामी विस्तार अधिकारी श्री गंगाराजू ऐनलावार कृषी अधिकारी श्री राऊत साहेब यांनी सहकार्य केले पुढील तपास श्रीमती स्मिता जाधव पोलीस उपनिरीक्षक हे करीत आहेत
जिल्ह्यातील सर्व कृषी वितरक यांना आव्हान करण्यात येते की कंपनीचे बियाणे घेते वेळेस कंपनीचा परवाना असल्याची खात्री करूनच बियाणे खरेदी करणे व शेतकऱ्यांना रीतसर विकणे असे आव्हान मिलिंद बीडबाग मोहीम अधिकारी जिल्हा परिषद, लातूर यांनी केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!