शेषाबाई शिंदे पाटील यांचे यांचे दुःखद निधन
शेषाबाई शिंदे पाटील यांचे यांचे दुःखद निधन
अहमदपूर (प्रतिनिधि) : तालुक्यातील टेंभुर्णी येथील ज्येष्ठ महिला शेषाबाई रावसाहेब शिंदे पाटील यांचे वृद्धापकाळाने दि. 16 रोज गुरुवारी रात्री आठ वाजता राहत्या घरी वयाच्या 86 व्या वर्षी दुःखद निधन झाले. त्यांच्यावर दि. 17 रोजी शुक्र वारी सकाळी अकरा वाजता अत्यंत शोकाकुल वातावरणात टेंभुर्णी येथील त्यांच्या शेतामध्ये अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात तीन मुले, सहा मुली, सूना, नातवंडे, परतवंडे असा मोठा परिवार असून टेंभुर्णीचे पोलीस पाटील लक्ष्मण पाटील, समता विद्यालयाचे लिपिक मदन शिंदे, प्रा. दैवशाला शिंदे – लोहकरे यांच्या त्या मातोश्री होत. त्यांच्या दुःखद निधनाबद्दल सर्व स्तरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
