संत ज्ञानेश्वर विद्यालयाच्या 655 विद्यार्थ्यांनी दिली संस्कृती संवर्धन परीक्षा
संत ज्ञानेश्वर विद्यालयाच्या 655 विद्यार्थ्यांनी दिली संस्कृती संवर्धन परीक्षा
अहमदपूर (गोविंद काळे) : संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान, मुंबई (महाराष्ट्र) यांच्या वतीने नैतिक शिक्षण उपक्रम अंतर्गत संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आली. यावेळी पर्यवेक्षक म्हणून भगवान कुलकर्णी, विश्वनाथ विळेगावे, जुगल किशोर शर्मा, प्रा.अनिल सांगवीकर उपस्थित होते.
मार्गदर्शक म्हणून देवेंद्र देवणीकर, परीक्षेचे जिल्हा समन्वयक प्रमोद कुलकर्णी सह संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका आशा रोडगे, माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मीना तोवर सह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
सदरील परीक्षेला रामायण, महाभारत, क्रांतिकारकांच्या कथांवर बहुपर्यायी व वर्णनात्मक प्रश्न होते.चौथी ते आठवीच्या एकूण 655 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. प्रारंभी विद्यालयाच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा विद्यार्थ्यांनी हाताने तयार केलेली कागदी फुले व शाल देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी परीक्षेचे संयोजक भगवान कुलकर्णी, विश्वनाथ विळेगावे, जुगलकिशोर शर्मा यांनी परीक्षा घेण्याचे कारण संस्कृती संवर्धन करणे आहे असे आपल्या मनोगतनातून सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक आशा रोडगे यांनी केले. सूत्रसंचालन युवराज मोरे यांनी केले तर आभार सय्यद मीर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.
