अ. भा. मराठी नाट्य परिषद उदगीर शाखेची कार्यकारणी जाहीर अध्यक्षपदी नागराळकर तर प्रमुख कार्यवाह डॉ. जेवळीकर

0
अ. भा. मराठी नाट्य परिषद उदगीर शाखेची कार्यकारणी जाहीर अध्यक्षपदी नागराळकर तर प्रमुख कार्यवाह डॉ. जेवळीकर

अ. भा. मराठी नाट्य परिषद उदगीर शाखेची कार्यकारणी जाहीर अध्यक्षपदी नागराळकर तर प्रमुख कार्यवाह डॉ. जेवळीकर

उदगीर (एल.पी.उगीले) : येथील अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा उदगीरच्या कार्यकारणीची घोषणा झाली असून अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात व बिनविरोध निवड प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यामध्ये अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर, उपाध्यक्ष प्रा. महेश बसपुरे, उपाध्यक्ष अश्विनी निवर्गी, प्रमुख कार्यवाह प्रा. डॉ. गौरव जेवळीकर, कोषाध्यक्ष अमित आग्रे, सहकार्यवाह डॉ. संजय कुलकर्णी, शिवकुमार डोईजोडे, रसूल पठाण यांची तर कार्यकारणी सदस्य म्हणून प्रा. रामकिशन सोनकांबळे, धनंजय गुडसूरकर, रामदास केदार, रमेश पवार, प्रा. डॉ. किरण गुट्टे, ॲड. बालाजी वलांडीकर, डॉ. कालिदास बिरादार, डॉ. स्मिता लखोटिया, प्रा. वंदना बांसवाडकर, दीपिका पाटील, हर्षदा भारती यांची निवड करण्यात आली. सल्लागार समिती सदस्य म्हणून प्राचार्य डॉ. राजकुमार मस्के, प्रा. महादेव गंदीगुडे, राम मोतीपवळे, डॉ. भाग्यश्री घाळे, गोपाळ जोशी, ॲड. व्यंकट मोरे, ईश्वरप्रसाद बाहेती, सुरेश देबडवार, बालाजी मुस्कावाड, विजयकुमार चवळे, ॲड. महेश मळगे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. निवडीनंतर शाखेचे नवनिर्वाचित अध्यक्ष बसवराज पाटील नागराळकर यांनी कार्यकारणीतील सर्व पदाधिकारी व सदस्यांना उदगीरमध्ये नाट्य चळवळ गतिमान करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी नाट्य परिषदेचे उदगीर शाखेतील सभासद बहुसंख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!