इनरव्हीलच्या संगीत स्वरांजली कार्यक्रमात चिमुकल्यांनी उदगीरकरांना केले मंत्रमुग्ध

0
इनरव्हीलच्या संगीत स्वरांजली कार्यक्रमात चिमुकल्यांनी उदगीरकरांना केले मंत्रमुग्ध

इनरव्हीलच्या संगीत स्वरांजली कार्यक्रमात चिमुकल्यांनी उदगीरकरांना केले मंत्रमुग्ध

उदगीर (एल.पी.उगीले) : इनरव्हील क्लबच्या वतीने भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या स्मरणार्थ संगीत स्वरांजली शालेय विद्यार्थ्यांची गीत गायन स्पर्धा भागीरथी मंगल कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आली होती.या कार्यक्रमाची सुरुवात उदगीर मधील सुप्रसिद्ध संगीत गुरू प्रा.सौ.संगिता बागडे यांच्या मधुर गीतानी झाली. स्वागत गीत पद्ममिनी संगीत विद्यालयाच्या समुहाने सादर केले.स्पर्धेसाठी परिक्षक म्हणून प्रा. संगिता बागडे , सौ. दिपिका पाटील व शिवलीला वाडकर लाभल्या होत्या. लाल बहादूर शास्त्री, महेश प्राथमिक विद्यालय,संत ज्ञानेश्वर विद्यालय, शामार्य कन्या विद्यालय,पोस्ते पोद्दार, माउंट लिटिरा, टाईम्स पब्लिक स्कूल, ओंकार संगीत विद्यालय, पद्मिनी संगीत विद्यालय येथील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.कार्यक्रमाचे सुत्र संचालन सौ. स्वाती गुरुडे व सौ. अश्विनी देशमुख यांनी केले. या वेळी मंचावर इनरव्हीलच्या अध्यक्षा सौ. मानसी चन्नावार, सचिव सौ. पल्लवी मुक्कावार यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ. दिपिका पाटील,आकाश बिरादार ,प्रमोद धामणे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या नियोजनासाठी इनरव्हील सदस्य भाग्यश्री स्वामी यांची मोलाची मदत झाली.इनरव्हील क्लबच्या कोषाध्यक्ष सौ. मीरा चंबुले, एडिटर सौ. अलका येरोळकर, सहसचिव योजना चौधरी व सदस्य डॉ. प्रियांका राठोड,कल्पना चौधरी,दिपा आंबेसंगे,गंगा पांडे, सुप्रिया महाजन, सोनल आचमरे,पंकजा औटे यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष मेहनत घेतली.स्पर्धेतील स्पर्धकांना पहिले,दुसरे, तिसरे व भरघोस बक्षिसे देण्यात आली.भरभरून दिलेल्या प्रतिसादाबद्दल सर्व विद्यालयाचे व पालकांचे मनःपूर्वक आभार इनरव्हीलच्या वतीने मानण्यात आले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!