सरदार वल्लभभाई पटेल शाळेची शैक्षणिक सहल संपन्न

0
सरदार वल्लभभाई पटेल शाळेची शैक्षणिक सहल संपन्न

सरदार वल्लभभाई पटेल शाळेची शैक्षणिक सहल संपन्न

उदगीर (एल.पी.उगीले) : राष्ट्रीय ज्ञान विकास मंडळ उदगीर द्वारा संचलित सरदार वल्लभभाई पटेल सेमी इंग्रजी शाळेची शैक्षणिक सहल समृद्ध कोकण पर्यटनासह पश्चिम महाराष्ट्रात विविध तीर्थक्षेत्र, नैसर्गिक सौंदर्य पहात उत्साहात संपन्न झाली.या शैक्षणिक सहलीसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची एसटी बसची व्यवस्था केली होती. प्रथमतः सहलीच्या गाडी पूजनासाठी उपस्थित संस्थेचे अध्यक्ष भगवानराव वट्टमवार, संस्थेच्या उपाध्यक्षा अपर्णाताई पटवारी, संस्थेचे कार्यवाह डॉ. अंबादासराव देशमुख, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष उमाकांतराव बुधे, मुख्याध्यापिका मंजुषाताई कुलकर्णी, सेमी विभाग प्रमुख सौं आशा बेंजरगे, दिलीप बिरादार यांच्यासह पालकवर्ग उपस्थित होते.
शैक्षणिक सहल ही शाळेतील विध्यार्थ्यांना एक वेगळा आनंद मिळावा तसेच ऐतिहासिक विषयाचे ज्ञान मिळावे, भौगोलिक, सांस्कृतिक, शैक्षणिक गोष्टी प्रत्यक्ष पाहावयास मिळाव्यात. यासाठी शैक्षणिक सहलीचे आयोजन दरवर्षी केले जाते. शैक्षणिक सहलीच्या निमित्ताने सोलापूर सिद्धेश्वर मंदिर, नरसोबाची वाडी,दत्त मंदिर, कोल्हापूर महालक्ष्मी मंदिर, शाहू पॅलेस, रंग काळा तलाव, कनेरी मठ, सिंधुदुर्ग किल्ला, नानिजधाम, तारकर्ली ब्रिज, शिवसृष्टी, गरम पाण्याचा झरा, प्रतापगड, महाबळेश्वर, पाचगनी.आदी ठिकाणी भेटी दिल्या. एस टी महामंडळाच्या बसमधून 40 विद्यार्थ्यांसह चार शिक्षकांचा प्रवास आनंदमय झाला. सहल यशस्वीतेसाठी सेमी इंग्रजी विभाग प्रमुख सौं आशा बेंजरगे यांच्या मार्गदर्शना खाली सहल प्रमुख संदीप पाटील, रविकुमार रोडगे, वृषाला जाधव, भक्ती कुलकर्णी आदिनी परिश्रम घेतले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!