बनशेळकी येथे कलापंढरी संस्थेने संस्कृतीक कार्यक्रमातुन केली लोकजागृती
बनशेळकी येथे कलापंढरी संस्थेने संस्कृतीक कार्यक्रमातुन केली लोकजागृती
उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर तालुक्यातील बनशेळकी या ठिकाणी कलापांढरी संस्थेच्या पुढाकरातून संस्कृतीक कार्यक्रमातुन समाजातील विविध सामाजिक प्रश्नावर लोकजागृती करण्यात आली.या वेळी जिल्हा परिषदचे मुखाध्यपक मदन पाटील, कला पांढरी संस्थेचे कार्यक्रम व्यस्थापक शिवदर्शन सदाकाळे,नरसिंग शेळके,सैनिक विद्यासागर मानकरी,शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष बालाजी बंडे, सहशिक्षक पंढरपूरे, नितिन हुडगे ई उपस्थित होते. या वेळी सर्व मान्यवरच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेच पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.
या वेळी गावातील मुलींनी कलापथकातून बालविवाह प्रतिबंधाचा संदेश,बालमजूरी प्रतिबंधासाठी गावागावात जागर, पालकांनी आपल्या मुलीचा बालविवाह न करता तीच्या पायावर उभे राहण्यासाठी पदवीपर्यंत शिक्षणाच्या प्रवाहात ठेवावे, तीच्या आवडीच्या क्षेत्रात तीला करीअर करण्यासाठी प्रोत्साहन द्यावे, बालमजूरी ला न पाठवता शिक्षणाच्या प्रवाहात ठेवल्यास नक्कीच मुलगी तीच्या आवडत्या क्षेत्रात करीअर करुन ती तीच्या पायावर उभे टाकते ,फक्त तीला पालकांनी प्रोत्साहन देणे गरजेचे आहे, या विविध नाटीकेतून पालकांना संदेश देण्यात आला.तसेच या नंतर देशभक्तीपर गीते, गवळण
छञपती शिवरायांचा पोवाडा, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्यावर गिते, ई या ठिकाणी सादर करण्यात आले. या वेळी गावाकरांनी या कार्यकामला मोठा प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमला सोसायटी चेअरमन प्रल्हाद महाजन,ग्रामपंचायत सदयस महादेव पाटील, उमाकांत लोहारे, सय्यद ईसराईल, उमाकांत आंबेगावे, नामदेव सावळे, विनायक श्रीडॊळे,महादेव बिरादार,शाम पाटील, महादेव हाडोळे,यांच्यासह गावातील नागरीक, महिला, विध्यार्थी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कला पांढरीचे संस्थेचे वैशाली सोनकांबळे, तानाजी सूर्यवंशी व बनशेळकी कला पंढरी इन्चार्ज मोनिका श्याम पाटील यांनी केले. कार्यकमाचे सूत्रसंचालन अन्तेश्वर पटवारी यांनी केले.
