मराठी भाषेत विविध संशोधन होणे काळाची गरज – डॉ.म.ई.तंगावार
मराठी भाषेत विविध संशोधन होणे काळाची गरज - डॉ.म.ई.तंगावार
उदगीर (एल.पी.उगीले) : मराठी भाषेला नुकताच अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. आता आपणा सर्वांवर मराठी भाषेच्या अभ्यासात वाढ करणे आणि त्याचे संशोधन करणे याची जबाबदारी वाढलेली आहे. म्हणून मराठी भाषेत विविध संशोधन होणे काळाची गरज आहे. असे मत श्री हावगीस्वामी महाविद्यालयातील डॉ.म.ई. तंगावार यांनी काढले. शिवाजी महाविद्यालयात मराठी विभागात सामंजस्य करार अंतर्गत व मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त ‘अभिजात मराठी भाषा आणि संशोधन’ या विषयावर व्याख्यान प्रसंगी ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.एम. मांजरे हे होते तर प्रमुख उपस्थिती डॉ.एस.डी.नीटुरे, मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ मुंबईचे सदस्य तथा कार्यक्रमाचे संयोजक डॉ.नरसिंग कदम, डॉ.सुरेश शिंदे,प्रा. गोविंद खराबे यांची होती. पुढे बोलताना तंगावार म्हणाले,मराठी भाषेला खूप जुना इतिहास आहे.अनेक पोथ्या अभ्यासासाठी आपल्याला उपलब्ध आहेत. त्या सर्वांचा अभ्यास करणे काळाची गरज आहे. अध्यक्षीय समारोपप्रसंगी डॉ मांजरे म्हणाले, मराठी ही आपली मायबोली आहे. तिचा सन्मान करणे,तिचा अभ्यास करणे आपणा सर्वांची गरज आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय सामंजस्य करारचे संयोजक डॉ.नरसिंग कदम यांनी सूत्रसंचालन मुंडे अंकिता यांनी तर आभार भोसले शेजल यांनी मानले. कार्यक्रमाला प्राध्यापक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
