चार चाकी व्हॅगन आर कारची पाठीमागुन जोराची धडक ; २० वर्षीय युवकाचा जागीच मृत्यु
चार चाकी व्हॅगन आर कारची पाठीमागुन जोराची धडक ; २० वर्षीय युवकाचा जागीच मृत्यु
अहमदपूर (गोविंद काळे) : शहरा जवळील लातुर- नांदेड रोड वरील कासनाळे पेट्रोल पंपासमोर चार चाकी वॅगन आर कंपनीच्या कारने दि १८ जाने रोजी सायंकाळी ०५ : ०० वाजता एका २० वर्षीय युवकाला भरधाव वेगाने पाठीमागुन येऊन जोराची धडक दिल्यामुळे सदरील युवकाचा जागीच मृत्यु झाला आहे
याविषयी सविस्तर माहीती अशी की अहमदपूर शहरातील ईदगाह रोड वरील उमर कॉलनीतील रहिम अलीम शेख वय २० वर्ष हा युवक एका खाजगी मोटार गॅरेज वर गाड्यांच्या पाटे मोपींगचे काम करीत होता दि १८ जाने रोजी सायंकाळी ०५ : ०० वाजता तो आपले गॅरेज वरील काम आटपुण लातुर -नांदेड रोड वरील कासनाळे पेट्रोल पंपासमोरून अहमदपूर शहरात आपल्या घराकडे पायाने परत येत असताना नांदेड कडून अहमदपूरकडे येणाऱ्या एका चार चाकी वॅगन आर कंपनीच्या कारने पाठीमागुन येऊन जोराची धडक दिली यात सदरील युवकाचा जागीच मृत्यु झाला असुन कार चालकाने कारसह पलायन केले आहे सदरील अपघात घडलेल्या घटनेची नोंद बातमी लिहीपर्यंत अहमदपूर पोलीसात करण्यात आलेली नव्हती.
