उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, उदगीरच्या वतीने सुरक्षित प्रवासासाठी प्रबोधन

0
उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, उदगीरच्या वतीने सुरक्षित प्रवासासाठी प्रबोधन

उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, उदगीरच्या वतीने सुरक्षित प्रवासासाठी प्रबोधन

उदगीर (एल.पी.उगीले) : वाहन चालवत असताना नियमांचे उल्लंघन होऊ नये. निष्काळजीपणे वाहन चालविल्याने चालकासोबत प्रवाशांचा जीव धोक्यात येतो. म्हणून अपघात रोखण्यासाठी व सुरक्षित प्रवासासाठी लोकांमध्ये जनजागृती होणे गरजेचे असते. रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या माध्यमातून प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री.विनोद चव्हाण तथा सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्री.आशिष कुमार अय्यर यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनेनुसार, लोकांना वाहन चालविताना तसेच रस्त्यावर चालत असताना आपण कशी काळजी घेतली पाहिजे, यासाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, उदगीर च्या वतीने उदयगिरी महाविद्यालयात वाहतूक नियमांचे महत्त्व सांगून जनजागृती करण्यात येवून सुरक्षा अभियानात संयुक्तपणे प्रयत्न केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. आर.के.मस्के हे होते. तर प्रमुख मार्गदर्शक व प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य एस.जी.कोडचे, उप प्रादेशिक परिवहन कार्यालय उदगीरचे अधिकारी तथा मोटर वाहन निरीक्षक सुनील खंडागळे, मोटर वाहन निरीक्षक मंगेश गवारे , सहा. मोटर वाहन निरीक्षक अक्षय पाटील, सहा. मोटर वाहन निरीक्षक अमोल सोमदे, उपप्राचार्य, प्रा.मलेश झुंगास्वामी, प्रा.प्रवीण जाहुरे, उदयगिरी कॉलेजमधील वरिष्ठ प्राध्यापक व प्राध्यापिका, शासन नियुक्त अशासकीय सदस्य ग्राहक संरक्षण परिषदेचे तथा राज्य प्रवासी संघटनेचे जिल्हाध्यक्ष एमवं ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्याचे जिल्हा संघटक बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर, गणेश जाधव उपस्थित होते.यावेळी राष्ट्रीय सुरक्षा रस्ते अभियाना अंतर्गत प्रवाशांमध्ये, वाहन चालकांमध्ये विशेष काळजी घेण्यासंदर्भात मोटर वाहन निरीक्षक सुनील खंडागळे, मंगेश गवारे, अक्षय पाटील, अमोल सोमदे यांनी विशेष असे उपस्थित विद्यार्थी, विद्यार्थिनींना, प्रवाशांना, वाहन चालकांना मार्गदर्शन केले. यावेळी मार्गदर्शन करताना ते म्हणाले की,अपघातग्रस्तांवर उपचार महत्वाचे आहे. अपघातावेळी घटनस्थळी उपस्थित असलेल्या व्यक्तींचे प्रथम प्राधान्य अपघातग्रस्त व्यक्तींचा जीव वाचविणे व त्यांना लवकरात लवकर वैद्यकीय उपचार मिळवून देणे हे असले पाहिजे आणि अपघातग्रस्त व्यक्तींवर तातडीने उपचार करण्याऱ्या वैद्यकीय व्यवसायिकांना तसे करण्यामध्ये कोणताही कायदेशीर अडथळा किंवा त्रास संभवत नाही. या सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालास प्रसिध्दी देवून त्या माध्यमातून जनजागृती करावी तसेच १०८ क्रमांकाचा आपत्कालीन वैद्यकीय सेवेचा वापर करण्यासाठी प्रबोधन करावे अशी असे आव्हानही उपस्थितांना केले.समारोपात प्राचार्य डॉ.राजकुमार मस्के म्हणाले, सजग राहिल्यास अपघात घडत नाही. वाहतूक नियमांचे पालन करून सुरक्षित वाहन चालवले पाहिजे.
यावेळी उपस्थित महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना, विद्यार्थिनींना व प्रवाशांना शपथ देण्यात येऊन जाणीव जागृती पत्रकाचे वाटप करण्यात आले. सूत्रसंचालन प्रा.सचिन कांबळे यांनी केले. तर आभार प्रा.प्रवीण जाहुरे यांनी मानले. कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ.एस.जी.पाटील, पर्यवेक्षक प्रा.एस.व्ही. मुडपे, प्रा.जी.एस.पाटील यांच्यासह प्राध्यापक तथा कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!