शिल्पा हरनाळे यांचे संगणक अभियांत्रीकी मध्ये पी.एच.डी.
शिल्पा हरनाळे यांचे संगणक अभियांत्रीकी मध्ये पी.एच.डी.
उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर तालुक्यातील मौजे वाढवणा येथील सुकन्या तथा भिमन्ना खंड्रे.इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी महाविद्यालय भालकी च्या संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागाच्या प्राध्यापिका श्रीमती शिल्पा शिवदास हरनाळे यांनी संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी या विषयामध्ये डाॅक्टरेट पदवी यशस्वीरित्या पुर्ण केली आहे.शिल्पा या तालुक्यातील वाढवणा बु.येथील शिवदास हरनाळे याच्या कन्या आहेत.त्यांनी आपले संशोधन डाॅ.धनंजय डी.मक्तेदार,प्राध्यापक गुरू नानक देव अभियांत्रीकी महाविद्यालय बिदर यांच्या मार्गदर्शनाखाली व विश्वेश्वरय्या तांत्रिक विश्वविद्यालय बेळगाव यांचे सोबत केले.या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन कुटुंबीय व मित्र परिवाराकडूनकडून करण्यात आले आहे.
