ज्ञानाचा वापर देश सेवेसाठी करावा न्यायाधीश आर एन कदम
ज्ञानाचा वापर देश सेवेसाठी करावा न्यायाधीश आर एन कदम
उदगीर (एल.पी.उगीले) : विद्यार्थ्यांनी ज्ञानाचा वापर देश सेवेसाठी करावा, शिक्षणामुळे मुली व महिलांमध्ये धाडस निर्माण होते. त्या धाडसाचा उपयोग स्वतः व दुसऱ्यावर होणारा अन्याय दुर करण्यासाठी करावे. अन्याय करणाऱ्या पेक्षा सहन करणार मोठा गुन्हेगार असतो. असे प्रतिपादन जिल्हा न्यायाधीश श्रीमती आर एन कदम यांनी केले. त्या मातृभूमी महाविद्यालयात तालुका विधी सेवा समिती व मातृभूमी महाविद्यालय आयोजित कायदेविषयक जनजागृती शिबिर प्रसंगी बोलत होत्या. मंचावर सह दिवाणी न्यायाधीश व्ही आर झेंडे, अॅ रुक्मीणी सोनकांबळे, मातृभूमी महाविद्यालयाच्या प्राचार्य उषा कुलकर्णी यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना न्यायाधीश कदम म्हणाल्या बालकाचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण होण्यासाठी पालक व नागरिकात कायदेविषयक जनजागृती होणे महत्त्वाचे असून बालकाच्या लैंगिक अत्याचार व संरक्षण करण्यासाठी बारा वर्षाखालील मुलीवर जर अत्याचार झाला तर आरोपीस फाशी शिक्षा होते, व अठरा वर्षावरील मुली व महिलांवर जर अत्याचार झाला तर जन्मठेपेची शिक्षा होते .असा कायदा असुन ज्या महिलावर अन्याय अत्याचार होतो त्या पीडित नसून त्या खंबीर असल्यानेच आत्याचारा विरोधात हिम्मत दाखवत आवाज उठवत असतात. यावेळी न्यायधीश झेंडे व अॅड रुक्मीणी सोनकांबळे यांनी विद्यार्थ्यना कायदे विषयक मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक अॅड महेश मळगे यांनी केले. सूत्रसंचालन बिभीषण मद्देवाड यांनी केले तर आभार उषा सातारकर यांनी मानले.
