शिवाजी महाविद्यालयात नेहरु युवा केंद्रामार्फत तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न
शिवाजी महाविद्यालयात नेहरु युवा केंद्रामार्फत तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा संपन्न
उदगीर (एल.पी.उगीले) : येथे नेहरु युवा केंद लातूर व शिवाजी महाविद्यालय उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने कबड्डी, खो खो, गोळा फेक, 100 मिटर धावणे इत्यादी स्पर्धांचे तालुकास्तरावर आयोजन करण्यात आले होते. जिल्हा युवा अधिकारी साक्षी समैया, लेखपाल संजय ममदापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धा शिवाजी महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य प्रा.डॉ.रामकिशन मांजरे यांच्या परवानगीने ज्ञान पंढरी क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आलेल्या होत्या. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून अंतर्गत हमी कक्षाचे समनवयक प्रा.डॉ. विष्णू पवार, तसेच रसायनशास्त्र विभागाचे प्रा.डॉ. अनंत टेकाळे, क्रीडा विभाग प्रमुख प्रा. नेहाल खान, प्रा. गजानन माने, तालुका समन्वयक अविनाश दुमपल्ले यांची उपस्थिती होती. 100 मिटर धावणे मुली स्पर्धेत प्रथम क्रमांक कु.भोसले सेजल श्रीमंत,व्दितीय क्रमांक वागदरे ऎश्वर्या. तृतीय क्रमांक जान्हवी सूर्यवंशी,100 मिटर धावणे पुरूष स्पर्धेत प्रथम आडे सुनील, मुंजेवार अलताफ व्दितीय क्रमांक, कोयलवार सक्षम तृतीय क्रमांक,गोळा फेक महिला स्पर्धेत प्रथम टोटगिरे जनाबाई,वागदरे ऎश्वर्या व्दितीय,शिंदे नेहा तृतीय क्रमांक,गोळा फेक पुरूष स्पर्धेत प्रथम चंदा सोहेल, मुंजेवार अल्ताफ व्दितीय, आडे सुनिल तृतीय क्रमांक ,खो-खो महीला प्रथम जिजामाता वारीयर्स, व्दितीय क्रमांक आर्मी इलेवन,कबड्डी पुरुष प्रथम मुर्की पलटन, व्दितीय क्रमांक उदगीर टायटन यांनी पारितोषिक पटकावले. विजेत्या खेळाडूंना ट्रॉफी व प्रमाणपत्र देण्यात आले. विजेत्या संघाची निवड जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी झालेली आहे.
हा कार्यकम यशस्वी करण्यासाठी क्रीडा विभाग प्रमुख प्रा. नेहाल खान, प्रा. गजानन माने, कु.पल्ली तेलंगे, कु. कुलकर्णी तनुजा, देवीदास उदगीरे,जाधव धोंडीबा यांनी सहकार्य केले. विद्यार्थ्यांनी पारितोषिक मिळवल्याबद्दल सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.
