इलेक्ट्रीकल टायपींग मिस्टेक कारण पुढे करत प्रथम क्रमांक घोषीत करून बक्षीस समारंभात सुवर्ण पदक देवून प्रथम क्रमांक रद्द

0
इलेक्ट्रीकल टायपींग मिस्टेक कारण पुढे करत प्रथम क्रमांक घोषीत करून बक्षीस समारंभात सुवर्ण पदक देवून प्रथम क्रमांक रद्द

इलेक्ट्रीकल टायपींग मिस्टेक कारण पुढे करत प्रथम क्रमांक घोषीत करून बक्षीस समारंभात सुवर्ण पदक देवून प्रथम क्रमांक रद्द

अहमदपूर (गोविंद काळे) : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे हयांचे द्वारे दिनांक २६/१०/२०२४ ते दिनांक २८/१०/२०२४ रोजी पावेतो लातूर येथे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय लातूर यांचे कडुन आयोजीत करण्यात आलेल्या राज्य स्तरीय शालेय योगासन स्पर्धा सन २०२४-२५ मध्ये अमरावती विभागाकडून कु. संस्कृती कैलास घट्टे, वर्ग ७ वा. विवेकानंद विद्यालय यवतमाळ ही खेळाडू १४ वर्षाखालील मुली योगासन ट्रेंडीशनल व आर्टिस्टीक हया प्रकारामध्ये खेळली, सदर खेळाडूने राज्यस्तरीय स्पर्धेकरीता निवड होणेसाठी तालुका स्तरीय, जिल्हास्तरीय, विभागीय स्तरीय योगासन स्पर्धेत ट्रेंडीशनल व आर्टिस्टीक या दोन्ही योगासन प्रकारात प्रथम क्रमांक प्राप्त केलेले होते. त्यानुसार लातूर येथे श्री. श्री. रविशंकर विद्यालय येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय योगासन क्रीडा स्पर्धेकरीता तिची अमरावती विभागातून निवड झालेली होती सदर स्पर्धेमध्ये खेळाडूला दिनांक २८/१०/२०२४ रोजी अंतीम सामने झाल्यावर निवड समितीने आर्टीस्टीक योगासन प्रकारामध्ये प्रथम क्रमांक घोषीत करून बक्षीस समारंभात सुवर्ण पदक देण्यात आले त्यानंतर आयोजक जिल्हा क्रिडा अधिकारी लातूर यांनी दुसरे दिवशी दिनांक २९/१०/२०२४ रोजी त्यांचे कार्यालयाचे आदेश काढून त्यात कु. संस्कृती हीचा प्रथम क्रमांक हा इलेक्ट्रीकल टायपींग चुकीने देण्यात आल्याचे व तीचा प्रथम क्रमांक रदद करण्यात आल्याबाबत क्रीडा व युवक सेवा संलालनालय व जिल्हा क्रीडा कार्यालय यवतमाळ येथे ई मेलद्वारे कळविले. सदर प्रकाराबाबत जिल्हा क्रिडा अधिकारी लातूर यांना विचारणा केली असता त्यांनी खेळाडूचे पालकांचे म्हणने ऐकून न घेता उडवा उडवीची उत्तरे दिली. म्हणून सदर प्रकरणात माहीती अधिकारा अंतर्गत खेळाडुचे पालकांनी अर्ज करून स्पर्धेची संपूर्ण माहीती जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय लातूर येथून घेतली असता जिल्हा क्रिडा अधिकारी लातूर श्री. जगन्नाथ लकडे हयांनी माहीती अधिकारामध्ये अर्धवट माहीती देवून उर्वरीत माहीती मोघम, खोटी व दिशाभूल करणारी दिली ७०० पांनांची माहीतीचे पैसे भरुन प्रत्यक्षात ५१७ पानांची माहीती मुदती नंतर दिली. त्यामुळे खेळाडुचे पालंकानी मिळालेल्या माहीतीची पाहणी केली असता त्यामध्ये खेळाडुचे स्कोअर शिट मधील मार्क, निकालपत्राचे मार्क हयामध्ये तफावत असल्याचे तसेच खेळाडुनां स्पेर्धेत देण्यात येणारे गुणांकनामध्ये विभागवार भेदभाव झाल्याचे तसेच त्यांची पाल्य कु. संस्कृती हीची नियमबाहय पध्दीतीने निवड रदद करून राष्ट्रीय स्पर्धेकरीता तीला जाणून बुजून डावलल्याचे निदर्शनास आल्याने खेळाडूचे पालंकांनी व स्वतः खेळाडुने तीचे शाळेमार्फत मा. आयुक्त, सहसंचालक, क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व उपसंचालक लातूर हयांचेकडे लेखी तक्रार केली असता सदर प्रकरणात त्यांनी कोणताच निर्णन न दिल्याने खेळाडुचे पालकांनी माहीती अधिकारात प्राप्त माहीती व प्राप्त पुरावे फोटोग्राफ चे आधारे सदरचे प्रकरण पुराव्यासह खेळाडुची आई सौ. वैशाली कैलास घट्टे रा. यवतमाळ हयांनी मा. उच्च न्यायालय मुंबई खंडपिठ औरंगाबाद येथे सादर करून मा. उच्च न्यायालयाचे निदर्शनास आणून दिले असता मा. उच्च न्यायालाला त्यामध्ये तथ्य आढळून आल्याने जिल्हा क्रिडा अधिकारी लातूर हयांचे आदेशाविरूध्द मा. उच्च न्यायालयात पिटीशन दाखल करून घेण्यात आलेली आहे. व सदर प्रकरणात खेळाडूवरील झालेल्या अन्यायाला कारणीभूत असलेले १) जिल्हा क्रिडा अधिकारी लातूर, श्री. जगन्नाथ लकडे २) क्रिडा अधिकारी लातूर श्री. कृष्णा केंद्रे ३) महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशन संगमनेर चे परीक्षक समिती मधील (पंच) प्रमुख श्री. सुहास पवळे, कोल्हापुर ४) पंच श्री. सिध्दार्थ खरे, नागपूर ५) पंच श्री.देवीदास सोन्नेकर, परभणी ६) पंच प्रणिता तरोटे, अहमदनगर ७) पंच फय्याझ जमादार, मुंबई उपनगर, ८) महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशनचे तांत्रीक समिती मधील स्पर्धा संचालक श्री राजेश पवार ९) स्पर्धा प्रमुख श्री. उमेश झोटींग १०) निवड तांत्रीक समिती मध्ये असलेले क्रीडा मार्गदर्शक श्री. रविभुषण कुमठेकर कोल्हापूर ११) श्रीमती योगेश्वरी मिस्त्री धुळे १२) श्रीमती चंचल माळी, जळगाव हे असून व सदरचा प्रकार उघडकीस आणुन देखील त्यावर कोणतीही कार्यवाही न करता तसेच तक्रारीवर निर्णय न देणारे मा.क्रोडा आयुक्त व

मा. सहसंचालक, क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे व उपसंचालक लातूर विभाग हयांचे विरूध्द दाखल करण्यात आलेले आहे.

तसेच शालेय योगासन स्पर्धेकरीता ग्रामिण भागातील खेळाडू अपु-या साधन सामग्रीचा व सोई सुवीधाचा उपयोग करून स्वताःच्या मेहणतीने राज्यस्तरीय शालेय स्पर्धेपर्यंत पोहचत असून सदर स्पर्धेमध्ये महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशन संगमणेर हयांचे पंच, निवडसमीती, तांत्रीक समिती सदस्य हयांनी खेळाडु निवडीमध्ये त्यांना देण्यात येणा-या गुणांकामध्ये भेदभाव करून फक्त महाराष्ट्र योगासन स्पोर्ट असोसिएशन संगमणेर हयांचेशी संबधीत खेळाडू, पंच, कोच, व योगासन अॅकेडमी मधील खेळाडुंना नियोजनबध्दरित्या जास्त / अतिरीक्त गुण देण्यात येवून त्यांची राष्ट्रीय योगासन स्पर्धेत निवड केल्याने इतर खेळाडु सोबत करण्यात आलेला भेदभाव व अन्याय तसेच सदोष निवड प्रक्रीयाविरूध्द व संबधीत अधिकारी व निवडसमिती, तांत्रीक समिती व परीक्षांका विरूध्द खेळाडूच्या पालंकांनी महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोग मुंबई येथे देखील तक्रार केली असून आयोगाचे अध्यक्षांनी आवश्यक ती कार्यवाही करण्यात येत असल्याचे कळविले आहे. तसेच सदर प्रकरणात मा. उच्च न्यायालय मुबई खंडपीठ औरंगाबाद हयांनी संबधीत गैरअर्जदार हयांना त्यांचे म्हणने सादर करण्याबाबत आदेशीत केलेले असुन अर्जदारांचे वतीने अॅड राहुल जोशी, संभाजीनगर हे काम पाहत आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!