महात्मा फुले महाविद्यालयात स्वातंत्र्यसेनानी स्वामी रामानंद तीर्थ यांना अभिवादन
महात्मा फुले महाविद्यालयात स्वातंत्र्यसेनानी स्वामी रामानंद तीर्थ यांना अभिवादन
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभागाच्या वतीने थोर राजकारणी व स्वातंत्र्य सेनानी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या स्वामी रामानंद तीर्थ स्मृतिदिन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी हे होते तर ह. भ. प. प्रो. डॉ. अनिल मुंढे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपाप्रसंगी उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी यांनी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या जीवन व कार्याचा परिचय करून देत अभ्यासपूर्ण माहिती दिली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. पांडुरंग चिलगर यांनी केले तर आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे सहाय्यक कार्यक्रमाधिकारी डॉ. सतीश ससाणे यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
