संत ज्ञानेश्वर विद्यालयात कायदेविषयक शिबिर विद्यार्थ्यांनी स्वसंरक्षण करणं काळजी गरज – न्यायाधीश स्वानंदी वडगावकर
संत ज्ञानेश्वर विद्यालयात कायदेविषयक शिबिर विद्यार्थ्यांनी स्वसंरक्षण करणं काळजी गरज - न्यायाधीश स्वानंदी वडगावकर
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील संत ज्ञानेश्वर विद्यालयात तालुका विधी सेवा समितीच्या वतीने बालकांचे लैंगिक शोषण होऊ नये म्हणून कायदेविषयक मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या सचिव प्राचार्या रेखाताई हाके-तरडे तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून अहमदपूर न्यायालयाच्या न्यायाधीश स्वानंदी वडगावकर, मुख्याध्यापिका आशा रोडगे,माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापिका मीना तोवर, एडवोकेट विकास कराड, गौतम कांबळे सह मान्यवर उपस्थित होते. प्रारंभी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीताने मान्यवरांचे शब्दसमनाने स्वागत केले.शाळेच्या वतीने शाल, ग्रंथ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक न्यायाधीश स्वानंदी वडगावकर यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण हक्क कायदा, पोक्सो कायदा, विद्यार्थीशी निगडित इतर कायद्यांविषयी माहिती सांगितली. तसेच बालिका दिनानिमित्त व राष्ट्रीय युवा दिनानिमित्त सर्व मुला-मुलींना स्वसंरक्षणाबाबत, गुड टच बॅड टच बाबत ही मार्गदर्शन केले. सदरील कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका आशा रोडगे यांनी केले तर सूत्रसंचालन सतीश साबणे व आभार मीना तोवर यांनी मानले शेवटी पसायदान घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
