महात्मा फुले महाविद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी
महात्मा फुले महाविद्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभागाच्या वतीने थोर स्वातंत्र्य सेनानी नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदु हृदय सम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या नेताजी सुभाषचंद्र बोस व स्व. बाळासाहेब ठाकरे जयंती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी हे होते तर नॅक समन्वयक तथा संस्कृत विभाग प्रमुख डॉ. प्रशांत बिरादार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस व हिंदु हृदय सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपाप्रसंगी उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांच्या ऐतिहासिक कार्यावर यथोचित मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. पांडुरंग चिलगर यांनी केले तर आभार राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. बब्रुवान मोरे यांनी मानले. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कार्यालयीन कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
