विभागीय ललित कला महोत्सवात यशवंत विद्यालयाचे भरीव यश

0
विभागीय ललित कला महोत्सवात यशवंत विद्यालयाचे भरीव यश

विभागीय ललित कला महोत्सवात यशवंत विद्यालयाचे भरीव यश

उपक्रमशील शाळा पुरस्काराने यशवंत विद्यालय सन्मानित
अहमदपूर (गोविंद काळे) : संत एकनाथ नाट्यमंदिर छत्रपती संभाजीनगर येथे मराठवाडा कला विकास महामंडळ आयोजित 36 व्या विभागीय ललित कला महोत्सवात यशवंत विद्यालय अहमदपूर येथील विद्यार्थ्यांने वैयक्तिक नृत्य व समूह नृत्यात उल्लेखनीय सादरीकरण करून भरीव संपादन केले.

यावेळी बक्षीस समारंभ व उद्घाटन सोहळ्यासाठी मराठी,हिंदी चित्रपटातील प्रसिद्ध नायीका भार्गवी चिरमुले,कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षक आमदार विक्रम काळे,प्रमुख पाहुण माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अनिल साबळे, निवृत्त अधिक्षक अभियंता राजेंद्र काळे,महामंडळाचे सचिव प्रल्हाद शिंदे, प्राचार्या संगीता शिंदे यांच्या उपस्थितीत दीप प्रजलाने कार्यक्रमाची सुरुवात होऊन भव्य दिव्य बक्षीस समारंभ सोहळा पार पडला.
कलाशिक्षक महादेव खळुरे यांच्या मार्गदर्शनाने दोन वैयक्तिक नृत्य व एक समूह नृत्य स्पर्धेसाठी निवडीने दि. 23 रोजी सकाळी संत एकनाथ नाट्य मंदिरात विद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्पर्धेसाठी उत्तम सादरीकरण केले. यात वैयक्तिक नृत्यात कु.क्षितिजा गजानन नळगीर व ओम नवनाथ तरुडे,समूहनृत्य साठी,साक्षी प्रकाश पारेकर,स्नेहा रामजी काटे,श्रेया बाळासाहेब पौळ,आनंदी अमोल बंडे,क्षितीजा गजानन नळगीर आदी विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला.
सदरील ललित कला महोत्सवात उल्लेखनीय सादरीकरण केल्याबद्दल वैयक्तिक नृत्यात कु.क्षितिजा नळगीर हिने तृतीय क्रमांक पटकावला तर समूह नृत्य मध्ये ग्रामीण भागातून द्वितीय क्रमांक यशवंत विद्यालयाने पटकावला. या महोत्सवात विशेष सहभाग नोंदवल्याबद्दल विद्यालयास उपक्रमशील शाळा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

वरील याच्याबद्दल टागोर शिक्षण समितीचे अध्यक्ष डॉ.अशोक सांगवीकर,सचिव शिक्षण महर्षी डी.बी.लोहारे गुरुजी,सह सचिव डॉ.सुनिता चवळे,मुख्याध्यापक गजानन शिंदे,उपमुख्याध्यापक माधव वाघमारे,पर्यवेक्षक रामलिंग तत्तापुरे,शिवाजी सूर्यवंशी सांस्कृतिक प्रमुख राजकुमार पाटील,डॉ.शरद कारकनाळे,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आदिनी अभिनंदन केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!