समता नायक महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याचे विटंबन ; लिंगायत समाजाचे निवेदन

0
समता नायक महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याचे विटंबन ; लिंगायत समाजाचे निवेदन

समता नायक महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याचे विटंबन ; लिंगायत समाजाचे निवेदन

अहमदपूर (गोविंद काळे) : कर्नाटक राज्यातील भालकी तालुक्यातील खटक चिंचोली येथील क्रांतीज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याची समाजकंटकाने विटंबना केल्याच्या निषेधार्थ संबंधितावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी. यासाठी सकल लिंगायत समाजाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपविभागीय अधिकारी मंजुषा लटपटे यांच्यामार्फत निषेधाचे निवेदन देण्यात आले.
या निवेदनामध्ये सदरील घटनेचा समाजाच्या वतीने तीव्र निषेध करून या माती फिरूंना त्वरित अटक करून अशा स्वरूपाच्या घटना होणार नाहीत याची प्रशासनाने काळजी घ्यावी अशी अग्रही मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनावर ओम भाऊ पुणे, प्रताप पाटील, अभय मीरकले,संदीप चौधरी, केदारनाथ काडवादे, माधवराव पुणे, शिवकुमार उटगे, विकास महाजन, प्रा. विश्वंभर स्वामी, राम तत्तापुरे, एडवोकेट स्वप्निल व्हते, ऍडव्होकेट किशोर कोरे, राजकुमार पुणे, धर्मराज चावरे, विठ्ठलराव गुडमे, आर आर पाटील, संजय पाटील, सुभाष गुंडीले, शिवा भारती, अनिकेत फुलारी, राजकुमार कुंमदळे, गणेश माने, दत्ता हेंगणे, राजकुमार गाढवे, मन्मथ मल्लिसे यांच्यासह समाज बांधव मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
या समयी ओम पूणे, केदारनाथ काडवादे, प्रा. विश्वंभर स्वामी, शिवकुमार उटगे यांची मनोगत पर भाषणे झाली.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!