अहमदपूर येथे तीन दिवसीय फिट इंडिया सप्ताहाचे आयोजन

0
अहमदपूर येथे तीन दिवसीय फिट इंडिया सप्ताहाचे आयोजन

अहमदपूर येथे तीन दिवसीय फिट इंडिया सप्ताहाचे आयोजनअहमदपूर येथे तीन दिवसीय फिट इंडिया सप्ताहाचे आयोजन

अहमदपूर (गोविंद काळे) : जयहिंद प्रयाग प्राथमिक शाळा, अहमदपूर आणि अहिल्यादेवी होळकर माध्यमिक विद्यालय, अहमदपूर येथे तीन दिवसीय फिट इंडिया सप्ताहाचे उद्घाटन संस्थेचे कार्याध्यक्ष श्री. शिवराज माने, मुख्याध्यापक प्रशांत माने आणि शाळेची माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू वैभवी माने यांच्या हस्ते करण्यात आले. वैभवीच्या हस्ते नारळ फोडून उद्घाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी मार्चपास्ट करून मानवंदना दिली. यावेळी विविध प्रकारच्या खेळांचे आयोजन करण्यात आले होते. धावणे, रिले शर्यत, कबड्डी, फुटबॉल, रग्बी, खो-खो, क्रिकेट आणि इतर क्रीडा, चैतन्यमय वातावरणात पार पाडण्यासाठी खेळाडू सज्ज होते. यावेळी कार्याध्यक्ष श्री.शिवराजजी माने यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना खेळाचे महत्त्व समजावून सांगितले आणि खेळ हा केवळ शारीरिक विकासासाठीच नव्हे तर मानसिक संतुलन आणि शिस्त राखण्यासाठीही उपयुक्त असल्याचे सांगितले. मुख्याध्यापक प्रशांत माने यांनी विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन केले. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी खेळ हा महत्त्वाचा भाग असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी सर्व स्पर्धकांचे खिलाडूवृत्तीने खेळ खेळण्यास आणि पूर्ण क्षमतेने उत्तम कामगिरी करण्यासाठीशुभेच्छा दिल्या. पूर्ण उत्साह आणि आनंदात क्रीडा महोत्सवाला सुरवात झाली.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!