हासर्णीत महात्मा फुले महाविद्यालयाचे ‘राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराचे’आयोजन
हासर्णीत महात्मा फुले महाविद्यालयाचे 'राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिराचे'आयोजन
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे विशेष निवासी युवक शिबिर मौजे हासर्णी ता. अहमदपूर जि. लातूर येथे दि.२५ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२५ या दरम्यान संपन्न होणार आहे.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच एन. एस. एस.विभागाचे कार्यक्रमाधिकारी डॉ. बब्रुवान मोरे, सहाय्यक कार्यक्रमाधिकारी डॉ. सतीश ससाणे व यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अभ्यास केंद्राच्या एन.एस.एस. विभागाचे कार्यक्रमाधिकारी डॉ. संतोष पाटील यांच्या नेतृत्वाखाली दि. २५ जानेवारी ते ३१ जानेवारी २०२५ या दरम्यान ‘युथ फॉर माय भारत, यूथ फॉर डिजिटल लिटरसी’ या विषयाच्या अनुषंगाने मौजे हसर्णी येथे विशेष निवासी युवक शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिराचे उद्घाटन किसान शिक्षण प्रसारक मंडळ उदगीरचे अध्यक्ष श्रीरंगराव पाटील एकंबेकर यांच्या अध्यक्षतेखाली दि.२६ जानेवारी २०२५ रोजी होणार असून उद्घाटक म्हणून डॉ.मंजुषा लटपटे उपविभागीय अधिकारी अहमदपूर तसेच किसान शिक्षण प्रसारक मंडळ, उदगीरचे सचिव पी. टी. शिंदे यांची विशेष उपस्थिती लाभणार असून या कार्यक्रमाप्रसंगी प्रा. डॉ. नामदेव गौंड, भाई किशनराव देशमुख महाविद्यालय चाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
या शिबिरांतर्गत ग्राम स्वच्छता, कोरोना प्रतिबंधक कार्यक्रम, आपत्ती व्यवस्थापन, नैसर्गिक साधन संपत्तीचे जतन, जलसाक्षरता, महिला सबलीकरण, अंधश्रद्धा निर्मूलन, बालविवाह प्रतिबंधक कायदा जनजागृती, मतदार जनजागृती, व्यक्तिमत्व विकास, एनईपी २०२०, डिजिटल साक्षरता, रक्तदान शिबिर, समाज प्रबोधन, युवा जनजागृती, कृषी कार्यशाळा, महिला मेळावा, कीर्तनातून सामाजिक प्रबोधन, व्यसनमुक्ती आणि आरोग्य आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तर या शिबिराचा समारोप दि. ३१ जानेवारी २०२५ रोजी किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारी सदस्य ज्ञानदेव झोडगे यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून यावेळी किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष माधवराव पाटील यांची विशेष उपस्थिती लाभणार असून या कार्यक्रमाप्रसंगी मनीष कल्याणकर उपविभागीय अधिकारी अहमदपूर, श्रीमती उज्ज्वला पांगरकर तहसीलदार अहमदपूर, प्रा.डॉ. रमेश गंगथडे इतिहास अभ्यास मंडळ सदस्य स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
या शिबिरातील विविध उपक्रमाचा ग्रामस्थांनी तसेच पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील, उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी, कार्यक्रमाधिकारी डॉ. बब्रुवान मोरे, कार्यक्रमाधिकारी डॉ. संतोष पाटील, सहाय्यक कार्यक्रमाधिकारी डॉ. सतीश ससाणे, हासर्णी गावच्या सरपंच सौ. वैशाली परमेश्वर करे, उपसरपंच बालाजी भीमराव राऊतराव, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानोबा तिडोळे, विद्यार्थी प्रतिनिधी कु. ऋतुजा देशमुख आदींनी केले आहे.
