ग्रामीण महाविद्यालयातील स्नेहसंमेलनातून अनेक गुणी कलावंत पुढे येतात…
ग्रामीण महाविद्यालयातील स्नेहसंमेलनातून अनेक गुणी कलावंत पुढे येतात…ग्रामीण महाविद्यालयातील स्नेहसंमेलनातून अनेक गुणी कलावंत पुढे येतात…
सुप्रसिद्ध कवी प्रा अनिल चवळे
किनगांव च्या महात्मा फुले महाविद्यालयाचे वार्षिक स्नेहसम्मेलन.
किनगांव (गोविंद काळे) : वार्षिक स्नेहसंमेलन म्हणजे तरुणाईच्या उत्साहाचा आणि आनंदाचा, स्नेह वृद्धीगत होण्याचा क्षण ज्याच्या डोळ्याने टिपला आणि मनात बसला तर कण्हत- कण्हत का गाणं म्हणत जगायचं या मंगेश पाडगावकरांच्या ओळीवर सकारात्मक चिंतन केले तर विद्यार्थ्याच्या कलात्मक गुणांचा विकास होतो व अनेक कलावंत पुढे येतात असे प्रतिपादन सुप्रसिध्द कवी तथा पर्यावरण मित्र प्रा अनिल चवळे यांनी किनगाव येथील महात्मा फुले महाविद्यालय आयोजीत गुरुवार दि २३ जानेवारी रोजी सकाळी ठीक १० वाजता वार्षिक स्नेह समेल्लनाच्या उद्घाटन प्रसंगी केलेलनाचे अध्यक्षस्थानी श्री छत्रपती शिवाजी महाराज सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष रामजी बोडके होते तर उद्घाटक सुप्रसिद्ध कवी तथा पर्यावरण मित्र प्रा अनिल चवळे होते प्रमुख अतिथी श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेच्या सदस्या श्रीमती लताताई मोरे,सचिव तथा प्राचार्य डॉ बबनराव बोडके, आदि मान्यवर उपस्थित होते यावेळी सुप्रसिद्ध कवी तथा पर्यावरण मित्र प्रा अनिल चवळे आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते सावित्रीबाई फुले व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलनाने स्नेहसंमेलनाचे उद्घाटन झाले त्यानंतर प्राचार्य डॉ बबनराव बोडके यांनी प्रस्ताविक मांडले स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी पुढे बोलताना प्रा चवळे म्हणाले की ,विद्यार्थ्याना त्याच्यातील कला गुण आयुष्यात मोठं व्यासपीठ मिळवून देऊन सोशल मीडियाच्या माध्यमातून मोनालिसा सारखं स्टार मिळवून देते आणि रोजगाराची संधी प्राप्त होते आपल्याकडे कला असेल तर कोणीही करू शकत नाही या स्नेहसंमेलनातून बोध घ्यावा असे म्हणत पर्यावरणवादी कविता सादर करून जमलं तिथं झाडं लावा झाडे तोडू नका असा संदेश ही दिला तरुणाई चा उत्साह द्विगुणीत करताना प्रेमाची चारोळी सादर करताना प्रेम हे प्रेमचं असतं , कोणीही कोणावर करावं याला बंधन नसतं ,भावना फक्त पवित्र असावी लागते ,तुमचं आमचं सेम असतं ‘ युवक- युवतीच्या मनात हास्य फुलविले यावेळी अध्यक्षीय समारोपातून रामजी बोडके यानी तरुणाईने आनंद घेण्याच्या शुभेच्छा दिल्या आणि गणराया ला वंदन करुन तरुणाई च्या अविष्काराने पारपांरिक लोकनृत्य , देशभक्तीपर गीतावर, चित्रपट गीतावर , मराठमोळ लावणी , शांताबाई , देश रंगीला नृत्य सादर करत उत्साहात स्नेह संमेलन संपन्न झाले यात कु साक्षी पवार , कु काजल मुंढे कु वैष्णवी इंगळे कु ज्ञानेश्वरी डिगोळे, कु गायत्री इंगळे, कु पवन कांबळे ,कु भागवत मोहिते , कु माधव वाघमारे कु आदि युवक युवतीं आणि बाल चिमुकले कु स्पृहा स्वामी ,कु अक्षिता वरवटे, कु वरद जाधव आदीनी खुपच चांगला नृत्य अविष्कार करून उपस्थिताने मने हेलावली या स्नेहसंमेलनासाठी उपप्राचार्य डॉ विठ्ठल चव्हाण , सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ विरनाथ हुमनाबादे, प्रा अभय गोरटे, सहशिक्षीका ज्योती साने , डॉ चेतन मुंढे , प्रा विष्णू पवार,प्रा संजय जगताप , प्रा बालाजी आचार्य ,डॉ प्रभाकर स्वामी , डॉ सदाशिव वरवटे डॉ बळीराम पवार, डॉ अनंत सोमवंशी, प्रा राजकुमार शिंदे, प्रा राजू गुट्टे, डॉ ज्ञानेश्वर मुळे , प्रा पाडूरंग कांबळे ,गोपाळ इंद्राळे उद्धव जाधव शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी आदिनी परिश्रम घेतले या स्नेहसंमेलनाचे सूत्रसंचालन डॉ भारत भदाडे ,डॉ संतोष पवार , डॉ दर्शना कानवटे यांनी केले तर शेवटी आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ विरनाथ हुमनाबादे यांनी मानले राष्ट्रगीतानी स्नेहसंमेलनाची सांगता झाली.
