देशभक्तांचे देशभक्त म्हणजेच नेताजी सुभाषचंद्र बोस – बालाजी मुस्कावाड
देशभक्तांचे देशभक्त म्हणजेच नेताजी सुभाषचंद्र बोस - बालाजी मुस्कावाड
उदगीर (एल.पी.उगीले) : प्रखर देशभक्तीचे प्रतीक म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस होते ते जहाल विचाराचे असल्यामुळे काही लोकांना त्यांचे नेतृत्व मान्य नसल्यामुळे त्यांच्याबद्दल चुकीच्या धारणा निर्माण केल्या गेल्या होत्या मात्र त्यांची युद्धनीती फार मोठ्या प्रमाणात जगाला माहिती झाली होती अशा पद्धतीच्या महान योद्धा असलेल्या क्रांतिकारकाने देशाच्या स्वातंत्र्याचा पायारचला असे म्हटले तर वावगे होणार नाही असे विचार साहित्यिक तथा एनसीसी कमांडर बालाजी मुस्कावाड यांनी व्यक्त केले.
श्री छत्रपती शाहू महाराज सैनिकी विद्यालयात आयोजित नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
यावेळी झालेल्या कार्यक्रमात विचारमंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राचार्य वसंत कुलकर्णी तर प्रमुख पाहुणे म्हणून एनसीसी प्रमुख बालाजी मुस्कावाड, पर्यवेक्षक अरविंद सोनटक्के, प्रा. युवराज दहिफळे, गोविंद डिगोळे हे उपस्थित होते.
सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करुन करण्यात आली.
पुढे बोलताना बालाजी मुस्कावाड म्हणाले, महात्मा गांधी यांच्या विचारांनी प्रभावित होऊन नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी भारतीय स्वातंत्र्याचा लढ्यात आपला सहभाग नोंदविला. कुशाग्र बुद्धिमत्ता , प्रभावी विचार, तेजस्वी वक्तृत्व, कठोर परिश्रम व लढाऊ बाणा हे गुण नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या अंगी होते.
अध्यक्षिय समारोपात प्राचार्य वसंत कुलकर्णी म्हणाले, नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी जय हिंद व तुम मुझे खून दो मैं तुम्हे आझादी दुंगा हा नारा दिला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. युवराज दहिफळे यांनी केले तर आभार सुनील महिंद्रकर यांनी मानले. यावेळी विद्यालयातील सर्वच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
