उदगीर नगरपरिषदे कडून वृक्ष तोड करण्याऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल

0
उदगीर नगरपरिषदे कडून वृक्ष तोड करण्याऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल

उदगीर नगरपरिषदे कडून वृक्ष तोड करण्याऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल

उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर नगरपरिषद हद्दीतील न्यू केरला बेकरी समोरील बाजुस देगलूर रोड येथील रोडच्या बाजुस लावलेले झाडे कोणीतरी तोडले आहे. असे मुख्याधिकारी नगरपरिषद उदगीर यांना फोन आला. त्यांनी तत्काळ नगरपरिषदेच्या पथकास घटनास्थळी पाठवले, त्यावेळी पथकास तेथील तीन झाडे त्यामध्ये एक गुलमोहर व दोन बदामाचे झाड उंची अंदाजे पंधरा फुट असे एकूण तीन झाडे अनोळखी इसमाने तोडून टाकल्याचे निदर्शनास आले. एका बाजूला सुंदर शहर हरित शहर अशा पद्धतीची भूमिका घेऊन नगरपालिका प्रशासन काम करत असताना, दुष्ट प्रवृत्तीच्या काही लोकांनी आपल्या स्वार्थासाठी मोठमोठे झालेली झाडे तोडून टाकली आहेत. यापूर्वी देखील मुख्य रस्त्यालगतचे रहदारीला किंवा बांधकामाला अडचण करणाऱ्या काही झाडांना तोडण्याची परवानगी दिली होती मात्र त्याचा फायदा घेऊन इतरही अनेक मोठमोठी वृक्ष ज्या वृक्षांचा कसलाही अडथळा नव्हता ती देखील तोडून विक्री केल्याचे प्रकार उघडकीस आले होते. त्यानंतर आता हा प्रकार झाल्याने नागरिकांनी सजग राहणे गरजेचे आहे. रस्त्याच्या कडेला नगरपालिकेने नव्याने लावलेल्या चार-पाच फूट उंचीच्या झाडांचा आधार घेऊन त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपातील आसरा करून ठेवले वाले गाडीवाले रस्त्याच्या कडेला अड्डा निर्माण करत आहेत, काही ठिकाणी फळ व विक्रेते, खिचडी विक्रेते काय लावलेल्या झाडाचा आधार घेऊन त्याच्यावरच ताडपत्री टाकत असल्यामुळे त्या झाडाची वाढ होणे कठीण झाले आहे काही ठिकाणी तर त्या झाडाचे शेंडे तोडून टाकण्यात आले आहेत. असे प्रकार बसस्थानक परिसरात मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून येत आहे. मध्यंतरीच्या काळात या प्रकरणावरही ओरड झाली मात्र पालिका प्रशासनाने म्हणावे त्या गांभीर्याने या गोष्टीकडे लक्ष दिले नाही. किमान मोठ्या वृक्षांची तोड झाल्यानंतर आता तरी नव्याने लावलेल्या झाडांची निगा राखणे गरजेचे आहे. नगरपालिकेच्या वतीने विशेष काळजी घेतली जावी अशी अपेक्षा नागरिकांची आहे. मोठमोठी वृक्ष तोडून पर्यावरणास हानी पोहचवल्याने पथकाने घटनास्थळाचा पंचनामा करून उदगीर ग्रामीण पोलीस ठाणे अंतर्गत अज्ञात इसमा विरुद्ध भारतीय न्याय संहिता (बी.एन.एस.) २०२३ च्या कलम ३२४ (४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात सखोल चौकशी होणे ही गरजेचे आहे. नाहीतर असे अनेक गुन्हे फाईल बंद होऊन राहतात.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!