ग्रामपंचायत सोमनाथपूर येथे नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी
ग्रामपंचायत सोमनाथपूर येथे नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी
सोमनाथपूर (एल.पी.उगीले) : येथे ग्रामपंचायत कार्यालयात नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. गावच्या सरपंच सौ.अंबिका पवार यांच्या हस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करण्यात आले. यावेळी सदस्या सौ.शिवकर्णा अंधारे यांनी नेताजींच्या जीवनावर आधारित विविध प्रसंगांचे भाषणातून कथन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ.अंबिका पवार हे होत्या. यावेळी ग्रामसेवक अवकाश पवार, उपसरपंच अमीत माडे, सदस्या सौ.शिवकर्णा अंधारे, सदस्य सुभाष राठोड, प्रभु पाटील, राजकुमार वैजापूरे, मुकेश घोगरे, प्रेमदास पवार, लिपीक सुष्मा वाघमारे सह सर्व कर्मचारी, सेवक वर्ग उपस्थित होते. सूत्रसंचालन अमीत माडे यांनी तर आभार प्रदर्शन ग्रामसेवक अवकाश पवार यांनी केले.
