राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष युवक शिबिराचे शिवनखेड (खुर्द) येथे आयोजन
उदगीर (एल.पी.उगीले) : वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी संलग्नित कृषी महाविद्यालय, डोंगरशेळकी तांडा, उदगीर येथील कृषी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष युवक शिबिर मोजे शिवनखेड येथे आयोजित करण्यात आलेले आहे. या शिबिराचे उद्घाटन समारंभाचा अध्यक्ष म्हणून मौजे शिवणखेड खुर्द येथील सरपंच सौ. रुकसानाबी करीमसाब शेख, उद्घाटक म्हणून संस्थेचे सचिव गंगाधररावजी दापकेकर ही उपस्थित होते.
उद्घाटन प्रसंगी सौ शोभाताई बालाजी भंडारे, करीम साब शेख,विष्णुदास गुरमे, पंडित अंबादास शिंदे. व कृषी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ.ए एम पाटील,डॉ आनंद दापकेकर प्रा.एस आर खंडागळे, प्रा. पी एल सोळंके, प्रा. आशा अडलिंगे, राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. एस बी पवार, गावातील प्रतिष्ठित नागरिक, महिला व पुरुष व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.
कार्यक्रमाचा प्रारंभ समाज सुधारक संत गाडगे महाराज यांच्या प्रतिमा पूजनाने झाले. या शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी संस्थेचे सचिव गंगाधररावजी दापकेकर यांनी उपस्थित गावकऱ्यांना शेतीचे सखोल मार्गदर्शन केले. श्रमदानाचे महत्व विशद केले. कार्यक्रमाची प्रस्तावना उपप्राचार्य डॉ ए एम पाटील यांनी नमूद केली. या शिबिरादरम्यान ग्राम स्वच्छता, गाजर गवत निर्मूलन, वृक्षारोपण, शोष खड्डे, गटार दुरुस्ती, धार्मिक व सांस्कृतिक स्थळांची साफसफाई, अंधश्रद्धा निर्मूलन अशा विविध विषयांवर प्रबोधन कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. याचबरोबर मोफत आरोग्य तपासणी शिबिर, मोफत पशु निदान व उपचार शिबिर, शेतीपूरक उद्योजकता विकास व त्यातील संधी इत्यादी विषयांवर तज्ञ साधन व्यक्तीचे मार्गदर्शन आयोजित करण्यात आलेले आहे. या विषयावर संवाद, परिसंवाद व प्रात्यक्षिक अंतर्गत शास्त्रीय गांडूळ खत उत्पादन तंत्रज्ञान, दुग्ध व दुग्धजन्य पदार्थ उद्योजकता इत्यादी बाबत प्रात्यक्षिकातून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सांस्कृतिक पथनाट्य अशा अशा उदबोधनपर कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन करण्यात आले आहे, तरी शिवनखेड खुर्द ग्रामस्थांनी व पंचक्रोशीतील नागरिकांना या शिबिराचा अवश्य लाभ घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. सदरील उद्घाटन कार्यक्रमाचे संचालन व आभार डॉ एस बी पवार यांनी व्यक्त केले.