नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती उत्साहात साजरी
अतनूर (एल.पी.उगीले) : जळकोट तालुक्यातील जनक्रांती डोंगरी विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अतनूर, जिजामाता महिला मंडळ अतनूर, ग्राहकतीर्थ बिंदू माधव जोशी उर्फे नाना प्रणित ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्याच्या व वसुंधरा महिला मंडळाच्या वतीने भारतीय क्रांतिकारी, आझाद हिंद सेनेचे संस्थापक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून शंकर माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेतील अर्थशास्त्राच्या प्राध्यापिका सौ.वर्षा बिरादार- मरगणे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून दलित मित्र बालासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर, जनक्रांती डोंगरी विकास बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बी.जी.शिंदे अतनूरकर, ग्राहक संरक्षण परिषदेचे शासननियुक्त अशासकीय सदस्य तथा ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्याचे जिल्हा संघटक व राज्य प्रवासी महासंघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब गोविंदराव शिंदे अतनूरकर, सौ.रेणुका नागलगावे, जिजामाता महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.संध्या शिंदे, सौ.स्मिता चामले, सौ.स्मिता जाधव-पवार, सौ.शितल आरणे-गिरी, सौ.स्मिता हरकरे, सौ.स्वाती बुद्धीराज-डोंगरे, सौ.अर्चना जगताप, सौ.गीता जिरोबे, सौ.सुनिता स्वामी, वसुंधरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ.रुक्मिणी सोमवंशी उपस्थित होते.
मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दिपप्रज्वलन करण्यात आले. प्रमुख मार्गदर्शक प्रा.सौ.वर्षा बिरादार-मरगणे यांनी प्रखर देशभक्त सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनाविषयी व कार्याविषयी सविस्तरपणे माहिती दिली. तसेच अध्यक्षीय समारोपपर भाषणात प्रा. वर्षा बिरादार-मरगणे यांनी सांगितले की, सुभाष चंद्र बोस यांची जयंती साजरी करताना देशाविषयीचे प्रेम लहान वयातच जागृत झाल्यानंतर देश स्वतंत्र केल्याशिवाय बसणार नाही, असे व्यक्तिमत्व व जय हिंद हा राष्ट्रीय नारा देणारे. स्वराज्य निर्माण करणारे पराक्रमी व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांची जयंती पराक्रम दिन म्हणून साजरी केली जाते. तसेच सुभाषचंद्र बोस हे उच्च शिक्षीत होते. जहालमतवादी होते. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी इंग्रज सरकारविरुद्ध लढा दिला. आपणही त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन आपल्या देशाच्या रक्षणासाठी सदैव तयार असावे, असे आवाहन केले. सुत्रसंचलन वसुंधरा महिला मंडळाच्या सचिव सौ.एस.बी.शिंदे यांनी केले. तर आभार प्रदर्शन मयुरी बालासाहेब शिंदे अतनूरकर यांनी मांडले. कार्यक्रमाची सांगता शांतीमंत्राने झाली.