मोटारसायकलस्वारांचा ‘फटाका’ बंद. लातूर पोलिसांनी वर्षभरात 34 लाखांच्या 684 सायलेन्सरवर फिरवला राेलर!

0
मोटारसायकलस्वारांचा 'फटाका' बंद. लातूर पोलिसांनी वर्षभरात 34 लाखांच्या 684 सायलेन्सरवर फिरवला राेलर!

मोटारसायकलस्वारांचा 'फटाका' बंद. लातूर पोलिसांनी वर्षभरात 34 लाखांच्या 684 सायलेन्सरवर फिरवला राेलर!

लातूर (एल.पी.उगीले) : लातूर शहरासह जिल्ह्यात फटाका सायलेन्सर वापरणाऱ्या वाहनधारकांवर लातूर पाेलिसांकडून कारवाईचा बडगा उगारण्यात येत असून,कर्णकर्कश आवाज करीत सुसाट धावणाऱ्या वाहनधारकांना लगाम लावण्यासाठी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे,अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे यांचे मार्गदर्शनात वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गणेश कदम यांचे नेतृत्वात वाहतुक नियंत्रण पाेलिसांनी विशेष माेहीम हाती घेतली आहे.
मोटार वाहन कायद्यांतर्गत सन 2024 मध्ये मॉडिफाईड सायलेन्सचे 290 केसेस करून 2,81,500 रुपये दंड आकारण्यात आले तर कर्णकर्कश हॉर्नवर 544 केसेस करून 3,52,500 रुपये दंड आकारण्यात आले आहे.
लातुरात वर्षभरात तीन मोहीम राबवून एकूण 684 वाहनांचे अंदाजे 34 लाख रुपयाचे सायलेन्सर पाेलिसांनी जप्त केले. संबंधित वाहनधारकांविराेधात दंडात्मक कारवाईही करण्यात आली आहे. दरम्यान, जप्त करण्यात आलेल्या 34 लाखांच्या फटाका सायलेन्सरवर पाेलिसांनी थेट राेलर फिरवत ते नष्ट केले.
पाेलिसांकडून वारंवार सूचना देण्यात येऊनही काही हाैसी वाहनधारकांकडून फटाका, कर्णकर्कश आवाजाचे सायलेन्सर वापरले जात आहेत. याबाबत लातूर शहर वाहतूक शाखा आणि विविध पाेलिस ठाण्यांच्या पोलिस अमलदारा कडून कारवाई केली जात आहे. या कारवाईनंतरही काही वाहनधारक मूळ सायलेन्सर वापरत नसल्याचे दिसून आले. अखेर वर्षभरात लातूर पाेलिसांनी विविध मार्गांवर वाहन तपासणी करून फटाका (माॅडिफाय) सायलेन्सर जप्त केले. या जप्त केलेल्या सायलेन्सरबराेबरच त्या-त्या वाहनधारकांना दंडही करण्यात आला. काहींवर थेट न्यायालयात खटलाही दाखल करण्यात आला आहे.
लातूर पाेलिसांची धडक माेहीम.
सण-उत्सव काळात काढण्यात येणाऱ्या दुचाकी रॅलीत अशा फटाका सायलेन्सर असलेल्या दुचाकींचा माेठ्या प्रमाणावर सहभाग असल्याचे आढळून आले होते. पाेलिस अशांवर तातडीने कारवाई करीत वर्षभरात तब्बल 684 सायलेन्सर जप्त करून ते नष्ट केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *