शास्त्री प्राथमिक विद्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त ई-कचरा जनजागृती व संकलन अभियानास प्रारंभ

0
शास्त्री प्राथमिक विद्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त ई-कचरा जनजागृती व संकलन अभियानास प्रारंभ

शास्त्री प्राथमिक विद्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त ई-कचरा जनजागृती व संकलन अभियानास प्रारंभशास्त्री प्राथमिक विद्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त ई-कचरा जनजागृती व संकलन अभियानास प्रारंभ

उदगीर (एल.पी.उगीले) : भारतीय शिक्षण प्रसारक संस्था,अंबाजोगाई द्वारा संचलित लालबहादुर शास्त्री प्राथमिक विद्यालयात महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण संरक्षण विभागांतर्गत प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ई-कचरा संकलन व जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे.ई-कचऱ्या संदर्भातील माहिती सहशिक्षक सचिन आगलावे यांनी विद्यार्थ्यांना सांगितली.ई-कचरा संकलन दिनांक २४ जानेवारी ते २६ जानेवारी २०२५ पर्यंत होणार असल्याचे सांगितले.
मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे यांनी सर्व विद्यार्थ्यांना ई-कचऱ्यापासून होणाऱ्या धोक्याविषयी माहिती सांगितली व‌ सर्व विद्यार्थ्यांनी या अभियानात सक्रीय सहभाग घेऊन आपल्या घरातील तसेच,शेजारच्या घरातील ई-कचरा शाळेत आणून संकलित करण्याचे आवाहन केले.
ई-कचरा म्हणजे फ्रिज,वॉशिंग मशीन,फॅन,मायक्रोवेव्ह,टि.व्ही, वातानुकूलित यंत्रे,सीडी-डिव्हीडी, प्लेयर, होम थिएटर्स, संगणक, लॅपटॉप,पेन ड्राईव्ह, हेड फोन,चार्जर ,डिजिटल कॅमेरा,व्हिडिओ कॅमेरा, मोबाईल फोन,चार्जर इत्यादी व निरुपयोगी अथवा बंद स्थितीमधील कोणीतीही इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तू असतील.
वर्गश: विद्यार्थ्यांनी आणलेल्या ई-कचऱ्याचे संकलन करण्यात येत आहे.सर्व विद्यार्थी ,शिक्षक व पालक यांच्याकडून या अभियानास चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *