एस. टी. चलकास उच्च न्यायालयाचा दिलासा
छत्रपती संभाजीनगर(एल.पी.उगीले) : एस टी चालकास मा. उच्च न्यायालयाचे मा. न्या. किशोर संत यांनी दिलासा देत एस. टी. महामंडळाची याचिका फेटाळली. या प्रकरणी दि. २२/०३/२०१३ रोजी एस टी चालक शिवाजी पुंडलिक पोफळे हे उदगीर अहमदपुर रस्त्यावर MH 20 D 9544 बस चालवत असताना, अंदाजे ११.०५ वाजता खांडसरी वायगांव पाटी जवळ एक इनोवा कार दुसऱ्या कारला ओवरवटेक करत असताना एस. टी. ला उजाव्या बाजूने जोराचा धक्का दिला. इनोवा कार चालकाच्या चुकीमुळे बसमधील चार प्रवासी जखमी झाले, आणि इनोवा कार मधिल २ प्रवाशी मृत्युमुखी पडले. तत्कालीन विभागीय वाहतूक नियंत्रक यांनी यात एस टी चालकाची कहीही चुक नाही. असे निरीक्षण नोंदविले असताना देखील महामंडळाने एस. टी. चालक पोफळे यांना दोषी मानून, मूळ वेतनात तीन टप्पे कपात करण्याचा आदेश दिला. सदर नाराजीने एस. टी. चालक पोफळे यांनी कामगार न्यायालय लातूर येथे तक्रार दाखल केली.कामगार न्यायालय यांनी शिक्षा आदेश रद्द केला, आणि चालकास निर्दोष घोषित केले. तसेच कपात केलेला पूर्ण पगार दोन महिन्याचा आत चालकास द्यावा. असा आदेश पारित केला. या विरोधात महामंडळाने उच्च न्यायालय येथे रीट याचिका दाखल केली. ॲड अजिंक्य रेड्डी यानी एस. टी. चालकाची बाजू मांडत इनोवा चालक याच्या चुकीमुळे सदरील अपघात झाला आहे, तसेच प्रत्यक्षदर्शी साक्षीदार यांचे जबाब नोंदविले असता ऐकाही साक्षीदाराने एस. टी. चालकाच्या विरोधात जबाब नोंदवला नाही, असा युक्तिवाद मांडला. एस टी चालकास उच्च न्यायालयाचे न्या. किशोर संत यांनी दिलासा देत एस. टी. महामंडळाची याचिका फेटाळली, आणि कामगार न्यायालय लातूर यांचे आदेश कायम ठेवले. या प्रकरणात प्रतीवादी एस टी चालक यांचातर्फ़े ॲड अजिंक्य रेड्डी यांनी बाजु मांडली. त्यांना ॲड विष्णु कंदे यांनी सहकार्य केले.