महाराष्ट्र उदयगिरीत राष्ट्रीय मतदार दिन साजरा
महाराष्ट्र उदयगिरीत राष्ट्रीय मतदार दिन साजरा
उदगीर (एल.पी.उगीले) : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त राज्यशास्त्र विभागाने कार्यक्रमाचे आयोजन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ. एस. जी. पाटील होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. बी. डी. करंडे उपस्थित होते. डॉ. करंडे यांनी राष्ट्रीय निवडणूक आयोगाच्या स्थापनेचे महत्त्व विशद करून सजग मतदार होण्याचे आवाहन केले. उपप्राचार्य डॉ. पाटील यांनी विद्यार्थ्यांना मतदार दिनाची प्रतिज्ञा दिली व मतदार म्हणून नाव नोंदणीचे महत्त्व सांगितले. राज्यशास्त्र विभाग प्रमुख कॅप्टन डॉ. राम साबदे यांनी प्रास्ताविक केले, तर प्रा. डॉ. ज्ञानेश्वर यल्लावाड यांनी सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले.
