प्रजासत्ताक दिनानिमित्त मौलाना आझाद उर्दू प्राथमिक शाळेत भव्य कार्यक्रम

0
प्रजासत्ताक दिनानिमित्त मौलाना आझाद उर्दू प्राथमिक शाळेत भव्य कार्यक्रम

प्रजासत्ताक दिनानिमित्त मौलाना आझाद उर्दू प्राथमिक शाळेत भव्य कार्यक्रम

अहमदपुर (गोविंद काळे) : मौलाना आझाद उर्दू प्राथमिक शाळेत 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शाळेच्या आवारात आयोजित या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रध्वज फडकावून करण्यात आली. या प्रसंगी मुख्याध्यापक सोहेल जागीरदार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले, तर विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत गायन करून देशभक्तीचा भाव व्यक्त केला. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी देशभक्तिपूर्ण भाषण आणि सादरीकरणाद्वारे प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व पटवून दिले. याशिवाय, नाटक स्पर्धा, गीते आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
विशेष म्हणजे, पहिली ते सातवी इयत्तेतील विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी ट्रॉफी, पेन, वही यांसारखी बक्षिसे प्रदान करण्यात आली. शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्याच्या सहभागाने कार्यक्रम अधिक रंगतदार झाला. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षकवर्गाचे विशेष योगदान लाभले. यामध्ये मुहीब सर , राज मोहम्मद सर, अब्दुल्ला सर, सईद सर, नौशाद सर, अख्तर सर, खाजा बाजी, कैसर बाजी, निखत बाजी,अनिस बाजी, अंजुम बाजी आणि सालेहा बाजी हे शिक्षक उपस्थित होते आणि त्यांनी कार्यक्रमाचे यशस्वीपणे नियोजन केले. मुख्याध्यापकांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व समजावले आणि त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. शाळा व्यवस्थापन, शिक्षक आणि पालकांच्या सहकार्याने आयोजित हा कार्यक्रम स्मरणीय ठरला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!