पालकमंत्र्याच्या हस्ते गुणवंत खेळाडू जिल्हा क्रीडा पुरस्कार वितरण

0
पालकमंत्र्याच्या हस्ते गुणवंत खेळाडू जिल्हा क्रीडा पुरस्कार वितरण

पालकमंत्र्याच्या हस्ते गुणवंत खेळाडू जिल्हा क्रीडा पुरस्कार वितरण

अहमदपूर (गोविंद काळे) : 75 वा प्रजासत्ताक दिन समारंभा निमित्त रविवार दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी सन 2023 24 चा गुणवंत खेळाडू (महिला) जिल्हा क्रीडा पुरस्कार वैभवी प्रशांत माने व गुणवंत खेळाडू (पुरुष) जिल्हा क्रीडा पुरस्कार साईप्रसाद संग्राम जंगवाड यास लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंढे, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे आदी मान्यवराच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
तरी गुणवंत खेळाडूचे जीवन गौरव पुरस्कार प्राप्त श्री गणपतराव माने, श्री. डी. बी. लोहारे, श्री. शिवराज माने, श्री. अँड. बेडकुळे साहेब, तलवारबाजी संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रा.अभिजीत मोरे, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त दत्ताभाऊ गलाले, क्रीडा मार्गदर्शक प्रशांत माने व संतोष कदम. प्रशिक्षक वाज्जिरोद्दिन काझी, मोसिन शेख, आकाश बनसोडे, सुरज कदम, भाऊराव कदम, अक्षय कदम आदी नी अभिनंदन केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!