बालाघाट तंत्रनिकेतन मध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध क्रीडा स्पर्धा संपन्न
बालाघाट तंत्रनिकेतन मध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध क्रीडा स्पर्धा संपन्न
अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील रुद्धा येथील बालाघाट तंत्रनिकेतन मध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये क्रिकेट, व्हॉलीबॉल, हॉकी तसेच रांगोळी स्पर्धा भाषण स्पर्धा इत्यादी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये प्रथम आलेल्या संघास संस्था अध्यक्ष तथा भाजप प्रदेश प्रवक्ते गणेश हाके यांच्या हस्ते ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख प्रीती ताई कोळी प्राचार्य संग्राम कोपनर, मदन आरदवाड, संतोष लातूरे, संतोष कचवे, महेश सूर्यवंशी , कालिदास पिटाळे, मंगेश चव्हाण, समाधान गित्ते, माने, सतीश केंद्रे,सिद्राम मासोळे, विजय कुलकर्णी तसेच अश्विनी जाधव, रूपा पाटील, आरती पुणे,कविता जुबरे, अपेक्षा सोनोने, तसेच संग्राम सुरनर, भरत दुधाते, गणेश सुरनर, संतोष होनमाने आदिनी परिश्रम घेतले.
