शास्त्री प्राथमिक विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

0
शास्त्री प्राथमिक विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

शास्त्री प्राथमिक विद्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

उदगीर (एल.पी.उगीले) : भारतीय शिक्षण प्रसारक संस्था,अंबाजोगाई द्वारा संचलित लालबहादुर शास्त्री प्राथमिक विद्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त स्थानिक समन्वय समिती अध्यक्ष मधुकरराव वट्टमवार यांच्या हस्ते प्रमुख ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून शालेय समिती अध्यक्ष व्यंकटराव गुरमे तर, प्रमुख वक्ते म्हणून माधव केंद्रे.प्रमुख पाहुणे म्हणून शालेय समिती सदस्य बालाजी चटलावार, डॉ.प्रकाश येरमे,अर्थ समिती अध्यक्ष गजानन जगळपुरे,सुलभाताई कुलकर्णी,बालवाडी अध्यक्षा अंजलीताई नळगीरकर,वसंत कलकुटे, मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे,विभाग प्रमुख सुधाकर पोलावार व श्रीमती सुरेखाबाई कुलकर्णी उपस्थित होते. तसेच,स्थानिक समन्वय समिती अध्यक्ष मधुकरराव वट्टमवार यांची विशेष उपस्थिती होती.
मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन व दिपप्रज्वलन करण्यात आले. अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी समिती व कै.बाळासाहेब दिक्षित ज्ञानसाधना प्रतिष्ठान,उदगीरतर्फे शहर पातळीवर आयोजित सामुहिक देशभक्तीपर गीत गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवल्याबद्दल शाळेच्या संगीत चमू व मार्गदर्शक शिक्षिका श्रीदेवी कबाडे यांचा मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र,गुलाबपुष्प व ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला.संविधान उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले.
प्रमुख वक्ते माधव केंद्रे यांनी राष्ट्रीय सण प्रजासत्ताक दिनाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.प्रजासत्ताक दिन राष्ट्रीय सण म्हणून संपूर्ण भारतात साजरा केला जातो,असे सांगितले.
अध्यक्षीय समारोपपर भाषणात शालेय समिती अध्यक्ष व्यंकटराव गुरमे यांनी संविधानातील उद्दिशिकेचे महत्त्व समजून घेण्याचे आवाहन केले, व प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचलन श्याम गौंडगावे यांनी केले.वैयक्तिक पद्य सुरेखाबाई कुलकर्णी यांनी तर,आभार सौ.सविता बोंडगेबाईंनी मानले.
शालेय परिसरातून विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढण्यात आली तसेच जनजागृती करुन ई-कचरा संकलित करण्यात आला.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!