“उदगीर नगरपरिषद कार्यलया अंतर्गत विविध क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या संस्था, व्यक्ती यांच्या कार्याचा गौरव
“उदगीर नगरपरिषद कार्यलया अंतर्गत विविध क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या संस्था, व्यक्ती यांच्या कार्याचा गौरव
उदगीर (एल.पी.उगीले) : भारतीय प्रजासत्ताकचा ७६ वा वर्धापनदिन उदगीर नगरपरिषद कार्यालय अंतर्गत उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम प्रजासत्ताक दिनानिमित्त शहरातील सर्व थोर महापुरुषांचे स्मारक, पुतळा यांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. बांधकाम अभियंता अनिल कुरे यांचे हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर, जाहेद खादरी यांच्या हस्ते डॉ.झाकीर हुसेन चौक, कर अधिक्षक महेश शिंदे यांच्या हस्ते साहित्य रत्न आण्णाभाऊ साठे, भांडार विभाग प्रमुख संदिप कानमंदे यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर पुतळा स्टेशन रोड, लेखापाल चेतन रणखांब यांच्या हस्ते श्री.छत्रपती शाहू महाराज पुतळा, नगर रचनाकार पांडुरंग मोरे यांच्या हस्ते श्री.छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, बांधकाम अभियंता गुरुप्रसाद लोणारे यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर पुतळा न.प.व्यापारी संकुल, तर लेखापाल माधव कद्रेकर यांच्या हस्ते वसंतराव नाईक पुतळा इत्यादी ठिकाणी महापुरुषांना अभिवादन करण्यात आले.
मुख्य कार्यालय नगरपरिषद येथे प्रशासक सुशांत शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. तर मुख्याधिकारी सुंदर बोंदर यांच्या हस्ते अग्निशमन केंद्र येथे ध्वजारोहण झाले. तसचे शहर अभियान व्यवस्थापक महारुद्र गालट यांच्या हस्ते आधार शहरी बेघर निवारा केंद्र तळवेस, वैद्यकीय अधिकारी डॉ.रमण यनाडले यांच्या हस्ते नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे ध्वजारोहण झाले.
नगरपरिषद कार्यालय सदैव शहर स्वच्छता, पाणीपुरवठा, पथदिवे या अनुषंगिक बाबी मध्ये सदैव कार्य तत्पर असते. त्यासोबतच शहरातील अनेक समाजिक संस्था, व्यक्ती यादेखील या कार्यास आपल्या योगदान देत असतात, त्यांच्या कार्याचा गौरव करणे हे आपले आद्य कर्तव्य असून या भूमिकेतून मुख्याधिकारी सुंदर बोंदर यांच्या संकल्पनेतून समाजिक, आरोग्य, पर्यावरण, शिक्षण, महिला सक्षमीकरण, स्वच्छता, कौटुंबिक संवाद, वारीसेवा, योग, बेटी बचाव बेटी पढाव, आपत्ती व्यवस्थापन, वृक्ष लागवड व संवर्धन, दिव्यांग सहाय्य, जल पुनर्भरण, शहर सुशोभिकरण आदी क्षेत्रासह उदगीर शहरातील सर्व सामाजिक उपक्रमा मध्ये सक्रीय सहभाग घेवून उत्कृष्ट कार्य करणाऱ्या संस्था व व्यक्तींचा सन्मान करण्यात आला.
त्यात कारवा फाउंडेशन, माऊली प्रतिष्ठाण, उदयगिरी लॉयन्स नेत्र रुग्णालय, जिव्हाळा ग्रुप, जेष्ठ नागरिक संघ, जयवंतराव मित्रमंडळ, श्री. नवयुवक व्यापारी गणेश मंडळ, उदयगिरी महिला मंडळ, विरशैव लिंगायत समाज, श्रीमंत व्यापारी गणेश मंडळ, सुनील भुजंगराव देवणीकर आदी समाजिक संस्था व व्यक्ती त्यांचे प्रमुख त्यांचे सदस्य यांना सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल देवून मुख्याधिकारी सुंदर बोंदर, प्रशासक सुशांत शिंदे आदी मान्यवर यांच्या उपस्थिती सन्मानित करण्यात आले.
तसेच उदगीर नगरपरिषदे अंतर्गत सर्वच विभाग प्रमुख व कर्मचारी उत्कृष्टरित्या काम करत असतात, व आपल्या कार्यालयाचा नावलौकिक समाजामध्ये वाढवत असतात. त्यांच्या कार्याचे कौतुक व्होवे, त्यांचा आदर्श इतर अधिकारी, कर्मचारी यांनी घ्यावा. या उद्देशाने सन २०२४-२५ मध्ये अतिउत्कृष्ट कार्य करणारे यात प्रशासकीय विभाग, नागरिकांच्या समस्या निराकरण करणे, सर्व अधिकारी कर्मचारी समन्वय ठेवणे, वरिष्ठ कार्यालयास विहित वेळेत अहवाल आदर करणे, विविध शासकीय अभियान राबवणे इ, कार्या बाबत अग्रेसर असणारे अधिकारी त्यात उपमुख्याधिकारी सतीष बिलापट्टे, भांडार विभाग प्रमुख संदिप कानमंदे, स्थापत्य अभियंता अनिल कुरे, नामांतर विभाग प्रमुख व्यंकट बिरादार, ग्रंथालय विभाग प्रमुख ज्ञानेश्वर पारसेवार, संकीर्ण विभाग प्रमुख वैजनाथ बदनाळे या गुणवंत अधिकारी यांना प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह, शाल देवून गौरविण्यात आले.
तर शहर स्वच्छता मध्ये उत्कृष्टपणे काम करणारे सफाई मित्र स्वच्छता विभाग अ मधून बालाजी चंदन चौधरी, ब मधून प्रभाकर नागोराव खेडकर, क मधून महेश हरिबा चांदेगावकर, तर ड विभगा मधून सपनाबाई गौतम महालींगे, शेख माजीद शेख खलील या सर्वांचा प्रशासक सुशांत शिंदे, मुख्याधिकारी सुंदर बोंदर यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह, शाल देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी प्रशासक आणि मुख्याधिकारी यांनी उपस्थितांना ७६ व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. मोठ्यासंखेने सर्व अधिकारी, कर्मचारी, आशा वर्कर, नागरिक, माजी पदाधिकारी, सामाजिक संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
