औषध निर्मितीतील नाविन्यपूर्ण मॉडेलचे शरण पाटील यांच्या हस्ते अनावरण

0
औषध निर्मितीतील नाविन्यपूर्ण मॉडेलचे शरण पाटील यांच्या हस्ते अनावरण

औषध निर्मितीतील नाविन्यपूर्ण मॉडेलचे शरण पाटील यांच्या हस्ते अनावरण

मुरूम (एल.पी.उगीले) : येथील माधवराव पाटील कॉलेज ऑफ फार्मसीकडून प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून औषध निर्मितीतील नाविन्यपूर्ण मॉडेलचे अनावरण फित कापून उमरगा जनता सहकारी बँकेचे चेअरमन शरण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. प्रारंभी दिवंगत माधवराव (काका) पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्प अर्पण करून सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना अभिवादन करण्यात आले. माधवराव पाटील महाविद्यालयात शरण पाटील यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी संस्थेचे संचालक प्रा. डॉ. सतिश शेळके, राजू भोसगे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अशोक मिनियार, रोटरीचे माजी अध्यक्ष डॉ. नितीन डागा, प्राचार्य डॉ. अशोक सपाटे, उपप्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार, फार्मसीचे समन्वयक प्रा. डॉ. रवींद्र आळंगे, प्रा. डॉ. महेश मोटे, डॉ. सुधीर पंचगल्ले, डॉ. सुभाष हुलपल्ले आदींची प्रमुख उपस्थिती होती. औषध निर्मितीतील मॉडेल सादरीकरणात नबीलाल जमादार (फार्मसी औद्योगिक मॉडेल), आकांक्षा इंगळे (रक्तशुद्धीकरण), सुरज साठे (वेदना मार्ग), प्रियंका दुर्गा (मानसोपचार), पूजा अंबर (जीपीसीआर), रोहिणी पुजारी (हृदय आणि रक्तवाहिन्यांचे कार्य), अंजली पवार (पचन संस्था), हर्षदा सूर्यवंशी (औषधांच्या पॅकिंग इंडस्ट्री), सानिका इंगळे (स्नायू आकुंचन), ओमकार मुदकण्णा व पुष्कराज शिंदे (पेशिका विभाजन), शुभांगी गायकवाड, आश्विनी व निशिगंधा (ड्रग इंटरॲक्शन), ओमकार राजमाने व सुप्रिया (फुफुसांचे कार्य), विश्वराज पिसे (हॅमर मिल), अभिषेक चौघुले (रेशम निर्मिती), अंजली बेळंबे व अर्पिता धुमाळ (रक्तप्रवाह), रूपाली जमादार (किडनीचे कार्य), कांचन खरात (प्राणी पेशी), आरती दूधभाते व प्रज्ञा कीर्तने (मेडिकल स्टोर), सानिका पोतदार (ग्लोबल वार्मिंग), नवनाथ खंडाळकर (मानवनिर्मिती मॉडेल), दानिश सय्यद (वनस्पती पेशी), नौमन शिकलगार (ट्रान्सपोर्ट सिस्टीम अक्रस सेल), तेजस हलमडगे (सूक्ष्मदर्शिका), महादेव जाधव (मानवी शरीर रचना) आदी स्पर्धकांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला. प्रा. सुदीप ढंगे, प्रा. राहुल इंजे, प्रा. पायल आगरकर, प्रा. विनंती बसवंतबागडे, प्रा. वैष्णवी पाटील, प्रा. रजनंदिनी लिमये, प्रा. सदफअलमास मुजावर, प्रा. प्रियंका काजळे, प्रा. अनिल मोरे, प्रा. विवेकानंद चौधरी, प्रा. लखन पवार यांचे मार्गदर्शन लाभले. अमोल कटके, किशोर कारभारी, पल्लवी कमलापुरे, चंद्रकांत पुजारी आदींनी पुढाकार घेतला. यावेळी माधवराव पाटील महाविद्यालय व फार्मसी कॉलेजचे प्राध्यापक-प्राध्यापिका, शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद व विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *