तिरुका येथे राष्ट्रीय महामार्ग लवकर पूर्ण करावा म्हणून रस्ता रोको

0
तिरुका येथे राष्ट्रीय महामार्ग लवकर पूर्ण करावा म्हणून रस्ता रोको

तिरुका येथे राष्ट्रीय महामार्ग लवकर पूर्ण करावा म्हणून रस्ता रोको

उदगीर (एल.पी.उगीले) दळणवळणाची साधने उपलब्ध व्हावी त्या उद्देशाने नांदेड ते बिदर जळकोट मार्गे राष्ट्रीय महामार्गाचे काम 2021 मध्ये सुरू झाले. मात्र या महामार्गावर तिरुक्याच्या जवळ थोड्या अंतरावर मोठा पूल आहे. त्या ठिकाणचा रस्ता अर्धवट झाला आहे. पुलाचे कामही अर्ध्यावर थांबले आहे. पर्यायी रस्ता हा अत्यंत निकृष्ट दर्जाचा झालेला असल्यामुळे पूर्णपणे उखडून गेला आहे.
महामार्गावर पुलाचे अर्धवट काम झाल्यामुळे या पुलावरून भरधाव येणाऱ्या अनेक गाड्या सरळ खड्ड्यात पडले आहेत. पोलीस प्रशासनाची ह एक गाडी
खाली कोसळल्याने गंभीर अपघात होऊन एक कर्मचारी दगावला आहे. इतरही सहा सात अपघात या अर्धवट पुलामुळे झाले आहेत. राष्ट्रीय महामार्गाचे काम असूनही इतक्या मोठ्या प्रमाणात हलगर्जीपणा केला जात असल्याने नागरिकांमधून ओरड केली जात आहे. पर्यायी रस्ता उखडला गेल्यामुळे या रस्त्यावरून गाड्या ये जा करू लागल्या की परिसरात धुळीचे लोट पसरतात. परिणामतः नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची दाट शक्यता आहे. या सर्व गोष्टी ची गांभीर्याने दखल घेऊन राष्ट्रीय महामार्गाचे अर्धवट राहिलेल्या पुलाचे काम तात्काळ सुरू करावे अशी मागणी प्रशासनाला ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आली आहे.
हा मार्ग इतर ठिकाणी पूर्ण झालेला असल्यामुळे वाहने मोठ्या गतीने येतात आणि या अर्धवट पुलाच्या ठिकाणी अपघाताला बळी पडतात. या गोष्टीचे गांभीर्य प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधीने घ्यावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या मागणीकडे शासनाचे आणि प्रशासनाचे लक्ष वेध हवे म्हणून या अर्धवट झालेल्या पुलाच्या बाजूच्या पर्यायी रस्त्यावर रस्ता रोको आंदोलन करून आंदोलनकर्त्यांनी निवेदन देऊन तात्काळ काम पूर्ण करावे अशी मागणी केली आहे.
यावेळी तिरुका येथील सरपंच सुनीता खटके. उपसरपंच तथा काँग्रेस तालुका अध्यक्ष मारोती पांडे, काँग्रेस शहर अध्यक्ष महेश धुळशेट्टे, पाटोदा चे सरपंच सुनील नामवाड,कोळनूरचे चेअरमन बालाजी शिवशेट्टे, ऍड श्रीनिवास मंगनाळे,तंटामुक्ती चे अध्यक्ष गंगाधर गिरदवाड, संचालक महेताब बेग, संचालक आशिष पाटील, माजी सरपंच व्यंकट खटके, रमाकांत मद्देवाड,अंगद जाधव, पांडुरंग जाधव, तुकाराम सवारे, उद्धव पाटील,राजीव पाटील,नागनाथ कराड, पंढरी जाधव, जनार्धन घोनशेट्टे, ऍड. केशव पांडे, सत्यम लांडगे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी घटनास्थळावर पोलीस निरीक्षक गाडे, तहसीलदार लांडगे, महामार्ग अभियंता सोनटक्के, तलाठी पाटील, ग्रामसेवक श्याम पाटील यांनी आंदोलन करताना त्यांच्या भावना प्रशासनापर्यंत पोहोचवण्याच्या आश्वासन दिले. याप्रसंगी अंकुश पाटील, दयानंद पाटील,जयंत पाटील, व्यंकट सवारे, बाबु गायकवाड, नामदेव मुंडकर यांच्यासह गावकरी मोठया संख्येने उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *