प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने तहसीलदार रामजी बोरगावकर यांच्या वतीने मूकबधिर विद्यार्थ्यांना गणवेश वाटप
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने तहसीलदार रामजी बोरगावकर यांच्या वतीने मूकबधिर विद्यार्थ्यांना गणवेश वाटप
उदगीर (एल.उगीले) : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून उदगीर नगरीचे एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून कार्य बजावत असताना. सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम तहसीलदार राम बोरगावकर यांनी केले.
तहसीलदार बोरगावकर यांच्या मुलाचा वाढदिवस दिव्यांग मूकबधिर शाळेत साजरा करणार असा मानस मनामध्ये घेऊन आपल्या मुलांचा वाढदिवस सहकुटुंब सहपरिवार साजरा केला. त्याप्रसंगी बोलताना त्यांनी सांगितले की, बोलक्या व्यक्तीं साठी तर बरेच दानशूर व्यक्ती आहेत, पण ज्या व्यक्तींना बोलता ही येत नाही, आणि ऐकता येत नाही. अशा विद्यार्थ्यांना काहीतरी करावे म्हणून मुलांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रम प्रसंगी गोरगरीब कुटुंबातील दिव्यांग मूकबधिर मुले व मुली शिक्षण घेत आहेत. म्हणून 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना गणवेश चे वाटप आपल्या वतीने मी करणार आहे. हे अभिवचन दिले ते आज त्यांनी पूर्ण केले.
प्रत्यक्षपणे पाहणी करताना तहसीलदार राम बोरगावकर यांनी शाळेचे व्यवस्थापन, शाळेत शिकवण्याच्या साइन लँग्वेज च्या पद्धती व शाळेचं सुसज्ज वातावरण , ग्रुप हेअरिंग ऍड, बोलक्या भिंती,कॉम्प्युटर लॅब, निवास व्यवस्था, सुंदर मैदान,याबद्दल खूप प्रशंसा केली.सर्व गोष्टी प्रत्यक्षपणे त्यांनी पाहिल्या. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. व आपण करत असलेली सेवा ही खूप गौरवास्पद आहे असे या ठिकाणी संबोधले. संस्थेचे प्रमुख विकास तपशाळे यांनी आभार व्यक्त केले.
