डॉ. राधाकृष्णन प्राथमिक विद्यालयात संविधान जागृती महोत्सव व माता पालक मेळावा संपन्न

0
डॉ. राधाकृष्णन प्राथमिक विद्यालयात संविधान जागृती महोत्सव व माता पालक मेळावा संपन्न

डॉ. राधाकृष्णन प्राथमिक विद्यालयात संविधान जागृती महोत्सव व माता पालक मेळावा संपन्न

उदगीर (एल.पी.उगीले) : येथील डॉ.राधाकृष्णन प्राथमिक विद्यालयात प्रजासत्ताक दिनानिमित्त संविधान जागृती महोत्सव व माता पालक मेळावा, हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी ‘माझा उद्धार मीच करणार’ या विषयावर प्रा. अश्विनी देशमुख यांनी महिला पालकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त आदर्श शिक्षक रमाकांतराव बनशेळकीकर होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्था सचिव देविदासराव नादरगे, कल्पनाताई सोमवंशी, पुष्पाताई शिंदे यांची उपस्थिती होती. रमाकांतराव बनशेळकीकर यांनी संविधानाबाबत माहिती दिली. यावेळी डॉ. राधाकृष्णन प्राथमिक विद्यालय उदगीर व महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान जागृती महोत्सवानिमित्त संविधान ज्ञान परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये महिला पालकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. पालक स्वाती हरणे, ऐश्वर्या गायकवाड, भाग्यश्री येरपूरवाड, प्रतिभा सोमवंशी, पौर्णिमा शिंदे, प्रणिता सुळे यांना विश्वनाथराव मुडपे यांच्यातर्फे पुस्तक देऊन गौरविण्यात आले.
हळदी कुंकू कार्यक्रमानिमित्त पालकांना वाण देण्यात आले तसेच महिला बालकांच्या खेळाच्या स्पर्धा घेण्यात आल्या. यामध्ये जयश्री काविले, प्रियंका सोमवंशी, शिल्पा भाटकुळे या पालकांनी क्रमांक मिळविल्याबद्दल त्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक ज्ञानोबा कुंडगिरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षाताई पाटील यांनी तर आभार प्रफुलता बोडके यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मनोरमा तेलंगे, सुनिता शिंदे,आम्रपाली सोमवंशी, वर्षा बिरादार, विठ्ठल नादरगे, गोविंद रावळे, प्रशांत पांचाळ, रोहित बिराजदार यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमासाठी महिला पालक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!