१५% बस दर वाढ त्वरित रद्द करा, अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन – चंद्रकांत टेंगेटोल
उदगीर (एल.पी.उगीले) : महाराष्ट्र सरकारने अचानकच सर्वसामान्य माणसांचे कंबरडे मोडणारा निर्णय घेतला आहे. सामान्य माणसांच्या दळणवळणाचा महत्त्वाचा कणा असलेल्या एसटी बस भांड्यामध्ये १५% दर वाढ केली आहे. हा निर्णय अत्यंत चुकीचा असून सर्वसामान्य माणूस, गरीब माणूस याचे आर्थिक गणितच बिघडन गेले आहे. ही भाडेवाढ त्वरित रद्द करावी यासाठी उदगीर बस स्थानकात शिवसेना उदगीर च्या वतीने आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्र शासनाला एसटी बस आगार प्रमुखाच्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्यावतीने निवेदन देण्यात आले आहे. सदरील निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे की, अचानक महाराष्ट्र सरकारने १५% बस दर वाढ केलेली आहे,गोर गरिबांची लाल परी म्हणून ओळखली जाणारी बस महागडी झाली,सामान्य जनतेच्या जीवनावर हा भार आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकार आणि परिवहन महामंडळाने त्वरित झालेली दर वाढ त्वरित रद्द करावी अन्यथा शिवसेनेच्या वतीने चक्का जॅम आंदोलन करण्यात येईल. असा इशारा दिला आहे.
यावेळी अंकुश कोणाळे, उपजिल्हा प्रमुख, चंद्रकांत टेंगेटोल तालुकाप्रमुख, श्रीमंत सोनाळे विधान सभा संघटक, अनिल पंचाक्षरी, व्यंकट साबणे, लक्ष्मीकांत गुडमेवार,परशुराम इभुते,नागेश मोर्तळे,ऍड विष्णु चिंतलवार,अर्जुन आटोळकर, श्याम तवर,कृष्णा कंचे,राजेश चव्हाण,गोविंद बारसुळे यांच्यासह शिवसैनिक,प्रवाशी उपस्थित होते.