उदयगिरी लॉयन्स नेत्र रुग्णालयात तिरळेपणावरील मोफत तपासणी, उपचार व शस्त्रक्रिया महाशिबिर संपन्न
तिरळेपणा नेत्रतपासनी 320, तर 117 तिरळेपणा डोळयावर यशस्वी शस्त्रक्रिया.
उदगीर (एल.पी.उगीले):- अंधत्व निवारणाचा महायज्ञ सुरू केलेले मराठवाड्याच नव्हे तर महाराष्ट्रासह जगभर ख्यातकीर्त ठरलेल्या उदयगिरी लायन्स नेत्र रुग्णालयाने जनतेच्या हितासाठी अत्यंत मोठे पाऊल उचलत मोफत तिरळेपणावरील तपासणी उपचार व शस्त्रक्रिया शिबिराच्या आयोजन केले होते या शिबिरात 320 नेत्र रुग्णांची तपासणी झाली तर 117 नेत्र रुग्णां च्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. डॉक्टर रामप्रसाद लखोटिया यांच्या नेतृत्वाखाली हा महायज्ञ चालू असून संपूर्ण मराठवाडा अंधत्व मुक्त करण्याचा त्यांनी संकल्प केला आहे.
उदगीर येथील उदयगिरी लॉयन्स नेत्र रुग्णालयाने आपल्या अद्भुत अशा कामगिरीने आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.लहान मुले व उपवर मुलीसाठी नेहमीच वरदान ठरणारे तिरळेपणावरील शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन पुणे येथील पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठान व लातूर जिल्हा आरोग्य विभाग, उदयगिरी लायन्स धर्मादाय नेत्र रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमानाने हे शिबिर दिनांक 24,25 व 26 जानेवारी रोजी आयोजित करण्यात आले होते.पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठाणचे डॉ. मधुसूदन झंवर,अमरावती येथील डॉ.राजेश पवार यांच्या नेतृत्वाखालील संपूर्ण महाराष्ट्रातील 17 तज्ञ डॉक्टर्स व उदयगिरी लॉयन्स नेत्र रुग्णालयाचे 11 नेत्रतज्ञ यांच्या संयुक्त प्रयत्नातून या शिबिरात उपचार व शस्त्रक्रिया करण्यात आल्या.एकूण चारशे तिरळेपणा असलेल्या रुग्णांची तपासणी व उपचार करण्यात आले, तर 117 डोळयावर शस्त्रक्रिया करण्यात आली. 216 डोळयाच्या स्नायुवर व 83 रुग्णांवर तिरळेपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली.यात लहान मुलं, मुली व तरुण मुलींचा प्रामुख्याने समावेश होता.समाजात वावरत असताना आपण पाहतो की, अनेक तरुण मुला-मुलींचे लग्न करण्यास डोळ्याच्या तिरळेपणा असल्यामुळे अडचणी येतात. आणि लहान मुला मुलींचे तिरळेपणामुळे दृष्टी कमी होत जाते. या सर्वांसाठी हे शिबिर वरदान ठरले.
संपुर्ण मराठवाडा विभागातुन नेत्र रूग्ण तिरळेपणाचे उपचारासाठी आले होते.या सर्व रुग्णांसोबतच त्यांच्या सोबत आलेल्या आई,वडील व इतर नातेवाईकांची जेवणाची व निवासाची सोय मोफत उदय गिरी लायन्स धर्मादाय नेत्र रुग्णालय यांच्या वतीने करण्यात आली होती.
शिबीराचे उदघाटन सुशांत शिंदे उपविभागीय जिल्हाधिकारी, डॉ. श्रीधर पाठक,सचिव जिल्हा अंधत्व निवारण समिती लातुर,डॉ.देशपांडे व सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.लातूर जिल्हा आरोग्य विभागाचे खूप मोठे सहकार्य या शिबिरासाठी लाभण्याचे संयोजन समितीच्या वतीने कळविण्यात आले आहे.संपूर्ण लातूर जिल्ह्यातील राष्ट्रीय बाल सुरक्षा कार्यक्रम द्वारे प्रत्येक गावातील तिरळेपणा असलेल्या बालकांना या शिबिरात घेऊन येण्याचे कार्य व तपासणीसाठी या विभागातील कर्मचा-यांची व डॉक्टर्सची उपस्थिती पूर्ण वेळ होती.पुणे नेत्रसेवा प्रतिष्ठाणचे माध्यमातून त्यांच्याशी जोडलेले पूर्ण महाराष्ट्रातून अनेक शहरातील तज्ञ डॉक्टर्सनी या शिबिरास आपली उपस्थिती नोंदवून तपासणी व शस्त्रक्रिया केल्या. यात प्रामुख्याने पुण्याचे डॉ.मधुसूदन झंवर, डॉ.राजेश पवार यांचे नेतृत्वाखाली डॉ.वैभव वनारसे, डॉ.सुनील भुजबळ, डॉ.रमेश भांगे, डॉ.ललित शहा, डॉ.सचिन गाडे, डॉ. शामकांत कुलकर्णी, डॉ.राजेंद्र जाधव, डॉ.गणेश बांदळ, डॉ.मनोज बानगुडे, डॉ.आनंद खडके, डॉ.संजीव राठोड, डॉ.उदय कुडकर, डॉ.मयूर लांडे, डॉ. अनिल वायकुळे, डॉ.अमोल वालझडे, डॉ. सचिन बगाडे, डॉ.धर्मराज भोईटे, डॉ. गौरव व आरोग्य विभाग लातूर चे डॉ.शितल एकघरे, डॉ.बसवराज स्वामी, डॉ.श्रीकांत माचणवाड, डॉ. राहुल पाटील,डाॅ. देशपांडे उदगीर यांचे सोबतच उदयगिरी लॉयन्स नेत्र रुग्णालयाचे प्रमुख नेतृतज्ञ डॉ.सुदाम बिरादार यांचे सोबत रुग्णालयाचे 11 डॉक्टर्सनी या शिबिराच्या यशासाठी अथक प्रयत्न केले. या शिबिराचे आयोजन लॉयन्स क्लब उदगीर, लॉयन्स क्लब उदगीर उमंग व उदयगिरी लॉयन्स नेत्र रुग्णालयाने केले होते. यासाठी सर्व नियोजन डॉ. आर.एन. लखोटिया,लॉ.प्रा.महेश बसपुरे,लॉ.अजय मलगे,लॉ प्रदीप बेंद्रे,लॉ.ईश्वरप्रसाद बाहेती, लॉ, सुरेश देबडवार, ॲड.लॉ.व्यंकट मोरे, ॲड. लॉ बालाजी वलांडीकर, श्री. सुभाष वट्टमवार,लॉ.विजय देबडवार, लॉ.डॉ.भाग्यश्री घाळे,लॉ. विवेक जैन व सर्व लॉयन्स सभासद यांनी प्रयत्न केले.उदयगिरी लॉयन्स नेत्र रुग्णालयाचे सर्व कर्मचारी मागील एक महीन्यापासुन या शिबीराच्या यशस्वीतेसाठी प्रयत्नशिल होते.