बालाघाट एज्युकेशन कॅम्पस मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

0
बालाघाट एज्युकेशन कॅम्पस मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

बालाघाट एज्युकेशन कॅम्पस मध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील रुद्धा येथील बालाघाट तंत्रनिकेतन औद्योगिक प्रशिक्षण संस्था व सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने प्रजासत्ताक दिनाचा मुख्य कार्यक्रम रुद्धा गावचे उप सरपंच नाथराव केंद्रे यांच्या हस्ते संपन्न झाला.

यावेळी संस्था अध्यक्ष तथा भाजपा प्रदेश प्रवक्ते गणेश हाके आणि उपस्थित सर्व विद्यार्थी प्राध्यापक सर्व कर्मचारी याबरोबर सर्व देशवासीयांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम संपन्न झाल्याच्या नंतर प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतावरती डान्स, गायन इत्यादी कला सादर केल्या. त्याचबरोबर आयोजित शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये प्रथम द्वितीय तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांना सन्मानपत्र व मेडल देऊन संस्था अध्यक्ष गणेश हाके यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमासाठी माजी सभापती बालासाहेब गुट्टे, हेमंत गुट्टे, व्यंकटराव सुरनर, संचालक कुलदीप हाके, शिवालिका हाके, प्राचार्य संग्राम कोपनर, प्राचार्य मदन आरदवाड,प्राचार्य हरिदास सर सर्व प्राध्यापक व इतर कर्मचारी उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!