सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅशनल स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा
सम्राट चंद्रगुप्त मौर्य इंटरनॅशनल स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा
अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील रुद्धा येथील सम्राट चंद्रगुप्त मोर्य इंटरनॅशनल स्कूल मध्ये शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन दिनांक 22 जानेवारी पासून सुरुवात शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार प्राप्त दत्ता बाबुराव गलाले सर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली . संचालक कुलदीप हाके पाटील व संचालिका सौ शिवलिका कुलदीप हाके पाटील यांच्या शुभहस्ते मशाल
पेटवून आणि प्रतिमा पूजन करून क्रीडा महोत्सवाला सुरुवात झाली. या महोत्सवामध्ये एलकेजी – युकेजी पासून ते आठवीपर्यंतच्या सर्व मुला मुलींनी सहभाग नोंदविला. या महोत्सवामध्ये विविध पारंपारिक व आधुनिक क्रीडा प्रकार घेण्यात आले होते आणि मुलांनीही या महोत्सवाचा खूप आनंद घेतला. व सर्व स्पर्धक खेळाडूंचे संस्था अध्यक्ष गणेश हाके यांच्याकडून तोंड भरून कौतुक करण्यात आले. सर्व क्रीडा स्पर्धा संपन्न झाल्याच्या नंतर संस्था अध्यक्ष गणेश हाके यांच्या हस्ते केक कट करून या महोत्सवाची सांगता करण्यात आली.
या क्रीडा महोत्सवामध्ये विद्यार्थ्यांची तयारी करण्यासाठी सर्व शिक्षक इतर कर्मचारी सर्वांनी अथक परिश्रम घेऊन यशस्वीरित्या क्रीडा स्पर्धा संपन्न केल्या.
